संभाजीराजे प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजे प्रतिक्रिया
संभाजीराजे प्रतिक्रिया

संभाजीराजे प्रतिक्रिया

sakal_logo
By

प्रसाद लाड यांनी केवळ
माफी मागून चालणार नाही
---
संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून वक्तव्याचा समाचार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलेच कसे? असा प्रश्‍न युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला. शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची हकालपट्टी हाच एकमेव पर्याय सरकारकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
संभाजीराजे म्हणाले, की लाड जबाबदार व्यक्ती असून, आमदार आहेत. त्यांनी केवळ माफी मागून चालणार नाही. शिवरायांना अस्मिता, आराध्य दैवत म्हणायचे आणि असे वक्तव्य करायचे, हे बरोबर नाही. कोश्‍यारी यांनीही अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्यांच्याविरोधात सर्वप्रथम मी बोललो. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ३० जिल्ह्यांत आंदोलन केले आहे. कोश्‍यारींबाबतचे पत्र मी राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठविले आहे.
ते म्हणाले, की कोश्‍यारींच्या वक्तव्याबाबत भाजपचे सरकार शांत कसे काय आहे? त्यांना पदावर अजून का ठेवले? त्यामुळे त्यांची भूमिका दुटप्पी दिसते. उदयनराजे भोसले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. ते आणि मी वेगळे नसून एकच आहोत.
महाराष्ट्र ही संत, वीरपुरुष, राष्ट्रपुरुषांची भूमी आहे. येथे अशा व्यक्तिमत्त्वांबद्दल कोणी अवमानकारक बोलत असेल, तर सरकारने त्यासंदर्भात कायदा करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.