
वसंता नृत्यांगणा कार्यक्रम
66548
‘परंपरा २०२२’ला रसिकांची दाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : वसंता नृत्यांगण कला अकादमीचा ‘परंपरा २०२२’ कार्यक्रम रसिकांच्या उपस्थित बहरला.
निमित्त होते, शाहू स्मारक भवनात झालेल्या वसंता नृत्यांगणा अकादमीचे नृत्य संमेलनाचे. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे विनोदकुमार लोहिया, पुणे येथील नृत्य अलंकार अस्मिता ठाकूर, रमा कुलकर्णी प्राची फडणीस, श्री. हेरवाडे, प्राचार्य एस. एस. चव्हाण, नृत्य विशारद सरिता खाडिलकर, वर्षा खाडिलकर यांच्या उपस्थित श्री नटराजाचे पूजन, दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. संमेलनात ३५ मुलींनी कला सादर केली.
ओम नमो गणपती गणेशा, चतुर्भूज एकदंत विघ्नेश्वराय, तुंदीलतदन प्रसन्नवदनाय, सकल कलानिधी नृत्य मनोहराने श्री गणेशाला वंदन केले. क वर्षा यांनी ताल झपताल रचनेचे सादरीकरण करताना परंपरेनुसार थाट, आमद, तोडे, चरण, ततकार आदी रचना केली. देवी स्तूतीमध्येही मुलींनी विविध अविष्कार सादर केले. मृणालिनी मुरुळेकर यांनी व्हायोलिन तर हार्मोनियम ऋतुराज धुपकर, तबलावादन कृष्णात माळवदे यांनी साथ दिली. गीतांचा आवाज शीतल पोतदार यांचा होता.
आशा खाडिलकर यांनी स्वागत केले.