
मराठा इन्फंट्री माजी सैनिक संघटना कार्यक्रम
66538
.....
१९७१ च्या युद्धातील आठवणींना उजाळा
बुर्ज डे सेलिब्रेशनः महासैनिक दरबार हॉलमध्ये माजी सैनिक संघटनेतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : भारत-पाकिस्तानच्या १९७१ मधील युद्धातील शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी ‘बुर्ज डे सेलिब्रेशन’ कार्यक्रम कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये झाला.
मुक्त सैनिक वसाहत येथील १५ मराठा एल. आय. माजी सैनिक संघटनेने कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रथमच ५१ वा ''बुर्ज डे सेलिब्रेशन'' कार्यक्रम कोल्हापुरात साजरा झाला. भारत-पाकिस्तानमधील १९७१ मध्ये झालेल्या युद्धाचा विजय दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या युद्धात प्रत्यक्ष सेवा केलेले निवृत्त जवान, अधिकारी उपस्थित होते. यानिमित्त १९७१ मध्ये झालेल्या युद्धातील आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. या युद्धात लढलेल्या शूर जवानांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविले.
सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर अमर जवान स्मारकाला अभिवादन करून युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहीली. अखेरीस मराठा स्फूर्ती गीत गायिले. संघटनेचे सचिव सुभेदार मेजर राजू पाडळे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष सुभेदार मेजर विठ्ठल बडींगेकर यांनी आभार मानले.
या वेळी निवृत्त ब्रिगेडिअर अतुल गुप्ते, ब्रिगेडिअर एम. के. जी. मेनन, सी. के. रमेश, ब्रिगेडिअर एम. एम. विटेकर, ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी, कर्नल के. के. मेनन, कर्नल मनोज चतुर्वेदी, कर्नल ए. बी. जाधव, कर्नल एम. एस. राव, कर्नल विजय थोपटे, मेजर सागर परीट आदींसह १५ मराठा रेजिमेंटमधील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, ब्रिगेडिअर, कर्नल, सुभेदार, जनांवरांसह देशभरातून ४५० आणि कोल्हापुरातून ३०० असे ७५० आजी-माजी सैनिक उपस्थित होते.