वारणा नदी पडतेय कोरडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणा नदी पडतेय कोरडी
वारणा नदी पडतेय कोरडी

वारणा नदी पडतेय कोरडी

sakal_logo
By

jsp520
66623
दानोळी : येथील वारणा नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे पाणीही तळास गेले आहे.

वारणा नदी पडतेय कोरडी
बंधाऱ्याचे दरवाजे उघडे; शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आटापीटा
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. ५ ः पावसाळा आणि परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पाण्याची मुबलकता आहे. मात्र वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
नदीतील पाण्याची पातळी गेल्या आठवड्यापासून कमी झाली आहे. त्यात उपसा वाढल्याने पाण्याची पातळीने झपाट्याने तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह सिंचनाच्या विद्युतपंपाचे फुटबॉल उघडे पडल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारणा नदीला बारमाही पाण्याचा प्रवाह असतो. खोची व दानोळीच्या बंधाऱ्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेकडो गावांना पाण्याचा मुबलक पुरवठा होत असतो. गावागावातून पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी हजारो योजना या नदीवरून झाल्या आहेत. सध्या उन्हाचे चटके वाढत आहेत. त्याचवेळी पाणी टंचाई निर्माण होत असल्याने पीके धोक्यात आली आहेत.
विद्युतपंपाची फुटबॉल उघडे पडल्याने शेतीला पाणी देणे मुश्किल झाले आहे. नदीवरून पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी उपसा करणाऱ्या सर्वच गावांच्या योजना आहेत. त्याचे इंटक (पंपगृह) उघडे पडत आहेत. काही गावांचा पुरवठा बंद झाला असून काही गावांचा पुरवठा बंद होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांची नदीतील पाण्याच्या कमतरतेमुळे पंचायत झाली आहे. पाटबंधारे विभागाने विसर्गाचे नियोजन केले असते तर नदी कोरडी पडली नसती. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
---------------
चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. कालपर्यंत धरणातून ६०० क्युसेक्सने असणारा विसर्ग वाढवून ८०० क्यसेक्स केला आहे. पुढील दोन दिवसात कमी पाण्याचा प्रश्न संपेल.
-मिलिंद किटवाडकर, सहाय्यक अभियंता, कोडोली विभाग

बंधाऱ्याचे चार गाळे खुले आहेत. बाकीचे गाळे ११-१२ फुटाने बंद आहेत. सावर्डे-मांगले बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे धरणातून विसर्ग बंद होता. त्यामुळे पाणी कमी झाले आहे.
-नेहा देसाई, शाखाधिकारी, पाटबंधारे, दानोळी

बंधाऱ्याच्या पिलरची दूरवस्था झाली आहे. बंधाऱ्याच्या गाळ्यात फळ्या (बर्गे) एका बाजूला घातले आहेत. तेही व्यवस्थित घातले नसल्याने पाण्याची गळती राहते. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे.
-संदीप चौगुले, शेतकरी