Fri, Jan 27, 2023

शिबिरात ८० जणांचे रक्तदान
शिबिरात ८० जणांचे रक्तदान
Published on : 7 December 2022, 12:22 pm
शिबिरात ८० जणांचे रक्तदान
दानोळी ः पंचायत समितीचे माजी सभापती कै. नाथबाबा वाळकूंजे यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त गावात विविध कार्यक्रम झाले. रक्तदान शिबिर, फोटो पूजन आदी कार्यक्रम झाले. जनसेवा सोसायटीमध्ये जनार्दन लोहार यांच्याहस्ते फोटो पूजन झाले. रक्तदान शिबिरामध्ये ८० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान अक्षय ब्लडबँक मिरज यांच्या सहकार्याने झाले. अध्यक्ष केशव राउत, उपाध्यक्ष रमेश मल्लाडे, सचिव कुबेर केकले, दूध संस्थेचे अध्यक्ष धन्यकुमार पाराज, सरपंच सौ. सुनीता वाळकूंजे, सर्जेराव शिंदे, राम शिंदे आदी उपस्थित होते.