पत्रकांवरील काही बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकांवरील काही बातम्या
पत्रकांवरील काही बातम्या

पत्रकांवरील काही बातम्या

sakal_logo
By

फक्त फोटो 66723
कोल्हापूर : कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते मधुसूदन सावंत, अभिजित मांगोरे यांची कोल्हापूर अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल संघटनेतर्फे सत्कार झाला. शंकर चेचर, अध्यक्ष रवी लाड, उपाध्यक्ष रणजित आयरेकर, सचिव अमर जाधव, कार्याध्यक्ष सुरेंद्र चौगुले, समीर कवठेकर, इंद्रजित पोवार आदी पदाधिकारी, विक्रेते उपस्थित होते.
...
रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कोल्हापूर : श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह आणि संजीवन ब्लड सेंटरतर्फे रक्तदान शिबिर झाले. यामध्ये वसतिगृह विश्वस्त, पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, त्यांचे मित्र, नातेवाईक, सारस्वत ज्ञाती बांधव सहभागी झाले. १३४ जणांनी रक्तदान केले. या वेळी सारस्वत वसतिगृहाचे अध्यक्ष मोहन देशपांडे, सचिव सुधीर कुलकर्णी, सहसचिव अमित सलगर, विश्वस्त सचिन शानभाग, सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन ऊर्फ कल्याण जनवाडकर, अशोक रेगे, हरिष मोदी, संतोष मोदी, चेतन दळवी, विजय दळवी, अक्षता आसगेकर, वसतिगृहाचे निवासी अधीक्षक संजय भोपळे-पाटील, कार्यालयीन कर्मचारी कन्हैया मोरे, सेवक महादेव गोपाळ, विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित राऊत उपस्थित होते.
...
66697

ऋतुराज पानारीचे यश
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्य विक्रीकर निरीक्षक परीक्षेत ऋतुराज पानारी याने राज्यात पाचवा क्रमांक मिळविला. ऋतुराज हा विवेकानंद कॉलेजचा विद्यार्थी असून, त्याने तात्यासाहेब कोरे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी वारणानगर येथून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स्‌ पदवी प्राप्त केली आहे.
...
चित्रकला स्पर्धेचे बुधवारी आयोजन
कोल्हापूर : क्रांती हॅन्डिकॅप हेल्प मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे ६१ व्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ताराबाई पार्क गार्डन, आयुक्त बंगला शेजारी चित्रकला स्पर्धेचे बुधवारी (ता. ७) सकाळी आठ ते ११ वेळेत आयोजन केले आहे. ७ ते १२, १३ ते २० वयोगटांमध्ये स्पर्धा होतील. स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. स्पर्धेत प्रत्येक गटामध्ये एक ते तीन आणि उत्तेजनार्थ एक असे पारितोषिक देण्यात येईल. सहभागींना प्रशस्‍तिपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती सचिव संजय आडके यांनी पत्रकाद्वारे दिली.
...
दत्त जयंतीनिमित्त मोफत सेवा
कोल्हापूर : ॐ ग्रुप संचालित कोल्हापूर जिल्हा फोर व्हिलर वर्कशॉप ओनर वेल्‍फेअर असोसिएशन आणि रिसर्च फाउंडेशनतर्फे नृसिंहवाडी येथील श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांच्या फोर व्हिलर बंद पडल्यास मोफत सेवा देणार आहे. यासाठी बुधवारी (ता. ७) सकाळी आठ ते सायंकाळी आठपर्यंत नृसिंहवाडी फोर व्हिलर पाग व्यवस्था या ठिकाणी सेवा देण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष योगेश पाटील, नृसिंहवाडी टिमचे बजरंग खिरुगडे, सचिव बाहुबली खोत यांनी पत्रकाद्वारे दिली.
...
सूर्यवंशी ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती
कोल्हापूर : शहीद वीर अभिजित म. सूर्यवंशी ट्रस्टतर्फे दरवर्षी ‘बेस्ट जवान ऑफ द इयर'' हा पुरस्कार शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या स्मृतिदिनानिमित्‍त दिला जातो. तसेच ट्रस्टतर्फे जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या मुला-मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येते. हा उपक्रम २६ डिसेंबरला होणार आहे.
मार्च २०२२ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी परीक्षेत ७५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या जवानांच्या मुला-मुलींना अनुक्रमे १०००, ७००, ५०० रुपये तसेच १२ वी परीक्षेत ७५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या जवानांच्या मुला-मुलींना १५००, १२००, १००० रुपये अशी एक रकमी शिष्यवृत्ती, प्रशस्‍तिपत्र देऊन सत्कार करण्यात येईल. त्यांचे गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रतीसह (झेरॉक्स) आणि त्यांच्या पालकांच्या सैनिकी साक्षांकित (झेरॉक्स) ओळखपत्र १८ डिसेंबरपर्यंत अध्यक्षा मनीषा मदनराव सूर्यवंशीद्वारा शहीद वीर अभिजित म. सूर्यवंशी ट्रस्ट, ए वॉर्ड, शहीद वीर ''अभिजित'' निवास, शिवाजी पेठ येथे आणून द्यावी. गुणानुक्रमे येणाऱ्या पहिल्या तीन मुला-मुलींची निवड करण्यात येईल.
...
66716
कोल्हापूर : मुक्तसैनिक वसाहत येथे रेवणसिद्ध उत्सवानिमित्त ‘श्रीं’ची प्रतिमा आणि पालखी सोहळ्यात सहभागी भाविक.

रेवणसिद्ध उत्सव उत्साहात
कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत येथे वायंगणकर यांच्या निवासस्थानी श्री रेवणसिद्ध उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम झाले. यामध्ये अनाथाश्रम, कुष्ठग्राम, एचआयव्हीग्रस्त व्यक्ती, मनोरुग्ण, गरीब, गरजू व्यक्तींना कपडे, धान्य वाटप केले. विविध आजारावरील औषधे गरजूंना दिली. बापू वायंगणकर, भाविक, महिला, दानशूर व्यक्तींकडून हा उपक्रम राबविला जातो. वायंगणकर यांच्या निवासस्थानी श्री रेवणसिद्धांची मोठी प्रतिमा असून, मंदिर आहे. ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक काढली. पहाटे होमहवन, महाअभिषेक, काकड आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले.
...
‘कनवा’त गीता जयंती साजरी
कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरात गीता जयंती झाली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, सहकार्यवाह अश्‍विनी वळिवडेकर, मनीषा वाडीकर, नंदकुमार दिवटे, कार्याध्यक्ष अभिजित भोसले, शाम कारंजकर, मनीषा शेणई उपस्थित होते. ॲड. केदार मुनिश्‍वर यांनी गीतेतील संदर्भांची माहिती दिली. डॉ. जोशी यांनी गुरू परंपरेची माहिती दिली. वळिवडेकर यांनी गीतेतील श्‍लोक म्हणून दाखविले. विवेकानंद केंद्राचे समन्वयक अरुण कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.