अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा

sakal_logo
By

gad59.jpg
66734
गडहिंग्लज : मुस्लिम सुन्नत जमियततर्फे बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन देताना प्रा. आशपाक मकानदार, रमजान अत्तार, राजू खलिफ, यूनुस नाईकवाडे आदी.
--------------------------
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा
मुस्लिम सुन्नत जमियतची मागणी : शासनाच्या निर्णयाचा केला निषेध
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : केंद्र शासनाने मॅट्रीकपूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बंद करीत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करतानाच मुस्लिम सुन्नत जमियतने अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे.
केंद्र शासनाने २००८ मध्ये मॅट्रीक पूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सुरु केली. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन धर्मातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत होता. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करीत यंदा सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. शिष्यवृत्तीच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना अचानक शासनाने शिष्यवृत्ती बंद करीत असल्याचे जाहीर केले आहे. हा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करुन अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लावावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी निवेदन स्वीकारले. प्रा. आशपाक मकानदार, राजू खलिफ, रफिक पटेल, पी. एस. नदाफ, घुडूलाल शेख, रमजान अत्तार, मंजूर मकानदार, युनूस नाईकवाडे, मुस्ताक मुल्ला, सलीम खलीफ, शाहरुख मुल्ला आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.