Tue, Feb 7, 2023

लोकशाही दिन
लोकशाही दिन
Published on : 5 December 2022, 2:58 am
महापालिका लोकशाही दिनात
नगररचना संबंधित तीन अर्ज
कोल्हापूर, ता. ५ ः महापालिकेत सोमवारी झालेल्या लोकशाही दिनामध्ये सहा अर्ज दाखल झाले. त्यापैकी नगररचना विभागाशी संबंधित ३ अर्ज आहेत.
नागरिकांच्या तक्रारींची वेळीच निर्गत करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. सहा अर्जात इतर घरफाळा, पाणीपुरवठा व पवडी विभागाशी संबंधित प्रत्येकी एक अर्ज आला. तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याची सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.