छाननी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छाननी
छाननी

छाननी

sakal_logo
By

करवीरमध्ये सदस्यपदाचे ४१ अर्ज अवैध

कुडित्रेरः करवीर तालुक्यात ५३ ग्रामपंचायत सरपंचपदांसाठी ३७६ अर्ज दाखल झाले होते. आज छाननी झाली यामध्ये सरपंच पदाचे २, तर सदस्यपदाचे ४१ अर्ज अवैध ठरले आहेत. सरपंचपदासाठी गांधीनगर येथून व म्हाळुंगे येथील सरपंचपदासाठी भरलेला प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरला आहे. सरपंच पदासाठी ३७४ तर सदस्यपदासाठी २४१९ अर्ज वैध ठरले आहेत. शिंगणापूर येथे सदस्य पदासाठी दोन हरकती आल्या होत्या, मात्र या हरकती फेटाळल्या. कणेरीवाडी येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या मुलाने सदस्यपदासाठी अर्ज भरला होता. त्याला शिंगू शेळके यांनी आक्षेप घेतला. निखिल खोत यांनी ठेकेदार म्हणून काम केल्याचे पुरावे शेळके यांनी सादर केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. सडोली दुमाला येथे सदस्य पदासाठी १० अर्ज आले होते. एक अर्ज अपात्र झाल्याने नऊ जागांसाठी नऊ उमेदवार अर्ज उरल्याने सर्व सदस्य बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
....
भुदरगडला सरपंचपदाचे ५ अर्ज अवैध
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची सोमवारी छाननी झाली. सरपंचपदासाठी २५० व सदस्यपदासाठी १४४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत सरपंचपदाचे ५ व सदस्यपदाचे १९ अर्ज अवैध ठरले, तर सरपंचपदासाठी २४५ व सदस्यपदासाठी १४३० उमेदवारी अर्ज वैध ठरले. मौनी विद्यापीठातील तालुका क्रीडा संकुल व महात्मा फुले सदनात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली छाननी प्रक्रिया झाली.
.........

कागल तालुक्यात सरपंचपदाचे सर्वच अर्ज वैध

कागल : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंचपदासाठी २६ ग्रामपंचायतींसाठी १६९ उमेदवारांनी १७५ अर्ज दाखल केले होते. ग्रामपंचायत सदस्यांच्या २५० जागांसाठी १२६३ उमेदवारांनी १२६६ अर्ज दाखल केले होते. आज छाननीत सरपंचपदासाठीचे सर्वच अर्ज वैध ठरले. अर्ज माघारीनंतर स्थानिक आघाड्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
....
शिरोळ तालुक्यात सरपंचपदाकरिता १२७ अर्ज वैध

शिरोळ ः तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये लोकनियुक्त सरपंचपदाकरीता १२७ आणि सदस्यपदासाठी ८१९ अर्ज वैध ठरले आहेत. छाननी प्रक्रियेत सदस्य पदाचे तीन अर्ज अवैध ठरले आहेत.
.........

आजऱ्यात सदस्यपदाचे पाच अर्ज अवैध

आजराः आजऱ्यात ग्रामपंचायत निवडणूक छाननी प्रक्रियेत सदस्यपदाचे पाच अर्ज अवैध ठरले. नामनिर्दशन पत्रासोबत आवश्यक कागदपत्रे व घोषणापत्र जोडले नसल्याने उत्तूर, बहीरेवाडी, कानोली, लाकुडवाडी व गजरगाव या ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरला. सरपंचपदासाठी सर्व अर्ज वैध ठरले.
............

चंदगड तालुक्यात सदस्यपदाचे सात अर्ज अवैध
चंदगड : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी सरपंच व उपसरपंच सदस्य पदासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी झाली. यामध्ये सरपंच पदाचा १ तर सदस्य पदाचे ७ उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले. जेलुगडे येथील सरपंच पदासाठीचा तर सदस्य पदासाठी अडकूर २, कुदनूर ३, आसगोळी व तेऊरवाडी येथील प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरले. सरपंच पदासाठी १६९ तर सदस्य पदासाठी ९१८ उमेदवारी अर्ज वैध ठरले.
.....


गडहिंग्लज : मुगळी येथील दोघांच्या उमेदवारीवरील आक्षेपावेळी आपापल्या पक्षकारांच्या बाजूने युक्तीवाद मांडताना विधीज्ज्ञ. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------------
गडहिंग्लज तालुक्यात सरपंचाचे तीन अर्ज अवैध

गडहिंग्लज : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. त्यात तीन गावांतील सरपंचपदाचे तीन, तर नऊ गावांतील १४ सदस्य पदाचे अर्ज अवैध ठरविण्यात आल्याची माहिती तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली. जातीचे दाखले नसणे आणि दाखला पडताळणीची पोहोच नसणे या कारणामुळे यातील बहुतांश अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. कुंबळहाळ, येणेचवंडी, हडलगे येथील प्रत्येकी एक सरपंचपदाचे अर्ज अवैध ठरले, तर महागाव व भडगावात प्रत्येकी तीन, मुगळीतील दोन, डोणेवाडी, बेकनाळ, कडगाव, करंबळी, सांबरे, बड्याचीवाडी येथील प्रत्येकी एक सदस्यपदाचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. दरम्यान, छाननीअंती सरपंचपदाचे १८८ तर सदस्यपदाचे १०५७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत.
....

पन्हाळा तालुक्यात सरपंचपदाचे ४ अर्ज अवैध
आपटीः पन्हाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी छाननी प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सरपंचपदाचे ४ अर्ज तर सदस्यपदाचे १८ अर्ज अवैध ठरले. सरपंचपदासाठी एकूण २६१ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीतून कोलोली, काखे,येथून प्रत्येकी एक व पाटपन्हाळा येथून सर्वाधिक दोन असे एकूण ४ सरपंचपदाचे अर्ज अपात्र ठरले. त्यामुळे सरपंचपदासाठी २५७ अर्ज पात्र ठरले, तर सदस्य पदासाठी एकूण १,५०० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीतून १८ अर्ज अपात्र ठरवण्यात आले.
........

गगनबावड्यात ४ अर्ज अवैध
असळजः गगनबावडा तालुक्‍यातील २१ ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी ८१ तर सदस्‍य पदासाठी २९९ उमेदवारी अर्ज दाखल होते. आज झालेल्‍या छाननीमध्‍ये सरपंचपदासाठी दाखल झालेले सर्व अर्ज वैध ठरविण्‍यात आले तर सदस्‍य पदासाठीचे ४ अर्ज अवैध ठरविण्‍यात आले.