मराठा महासंघातर्फे हुतात्म्यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा महासंघातर्फे हुतात्म्यांना अभिवादन
मराठा महासंघातर्फे हुतात्म्यांना अभिवादन

मराठा महासंघातर्फे हुतात्म्यांना अभिवादन

sakal_logo
By

फोटो : चेचर देतील
....

छत्रपती चिमासाहेब महाराजांचा
इतिहास पाठ्य पुस्तकात घ्यावा

वसंतराव मुळीक : १८५७ च्या हुतात्म्यांना मराठा महासंघातर्फे अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : ‘छत्रपती चिमासाहेब महाराज यांचा इतिहास पाठ्य पुस्तकात घ्यावा,’ असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.
५ डिसेंबर १८५७ रोजी कोल्हापुरातील जुना राजवाडा येथे घडलेल्या रक्तरंजित, धगधगत्या इतिहासाला साद घालण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जुना राजवाडा येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. जुना राजवाडा, मेन राजाराम हायस्कूलसमोर १८५७ चे समर असलेल्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या प्रज्वलित करीत अभिवादन करण्यात आले. क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज की जय, अमर रहे अमर रहे फिरंगोजी शिंदे, रामजी शिरसाठ अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या.
मुळीक म्हणाले, ‘‘क्रांतिकारक छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या नेतृत्वाखाली सेनानी फिरंगोजी शिंदे, रामजी शिरसाठ यांच्या सेनेने ३१ जुलै १८५७ रोजी कोल्हापूर स्वतंत्र केले; परंतु इंग्रजांशी ५ डिसेंबर रोजी झालेल्या रणसंग्रामात फिरंगोजी शिंदे यांच्यासह शेकडो वीर धारातीर्थी पडले. कर्नल जेकबने या लढ्यात भाग घेतलेल्या वीरांना कैद केले. स्वाभिमानी, स्वामीनिष्ठ वीरांनी छत्रपती चिमासाहेब यांच्याविरुद्ध इंग्रजांना साथ देण्याचे नाकारले म्हणून लगेचच इंग्रजांनी राजवाड्याच्या चौकात या वीरांना तोफेच्या तोंडी दिले. शेकडो वीरांना राजवाड्याच्या भिंतीजवळ उभे करून गोळ्या घालून ठार केले. आजही या स्मृती जागृत व्हाव्यात, तरुण पिढीला कोल्हापूरच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा मिळावी, यासाठी छत्रपती चिमासाहेब महाराज यांचा धडा शालेय पुस्तकात घेतला पाहिजे.’’
या वेळी जुना राजवाड्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, बबनराव रानगे, अनंत म्हाळुंगेकर, शंकरराव शेळके, जयेश ओसवाल, प्रकाश पाटील, राजू परांडेकर, चंद्रकांत चव्हाण, शैलजा भोसले, उषाताई लांडे, संयोगीता देसाई, छत्रपती चिमासाहेब महाराज यांचे वंशज वैभवराज राजेभोसले, अशोक माळी, किशोर घाटगे, महादेव पाटील, प्रताप वरूटे, प्रतीक साळुंखे, मनोज नरके, तय्यब मोमीन, प्रभाकर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले.