दिवाकर कारंडे अखेर पोलिस ठाण्यात हजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाकर कारंडे अखेर
पोलिस ठाण्यात हजर
दिवाकर कारंडे अखेर पोलिस ठाण्यात हजर

दिवाकर कारंडे अखेर पोलिस ठाण्यात हजर

sakal_logo
By

फोटो - 66826
दिवाकर कारंडे अखेर
पोलिस ठाण्यात हजर
घरफाळा घोटाळाप्रकरणी सात दिवसांची कोठडी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः अटकपूर्व जामिनाची मुदत संपल्यामुळे महापालिकेचा तत्कालीन करनिर्धारक व संग्रहक दिवाकर बापूसो कारंडे (वय ५२, रा. तिवले गल्ली, कळंबा) आज लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. घरफाळा विभागातील तीन कोटी १४ लाख ६१ हजार ३८ रुपयांच्या घोटाळ्यात तो पहिल्या क्रमांकाचे संशयित आहे. घरफाळा विभागात करनिर्धारक व संग्रहक संजय भोसले यांनी याबाबतची फिर्याद १३ जून २०२० ला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी सांगितले, की अटक पूर्व जामिनासाठी कारंडेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची मुदत संपल्यानंतर केव्हाही अटक होऊ शकली असती. त्‍यामुळे तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला १२ डिसेंबरपर्यंत कोठडी मिळाली आहे. पोलिस उपनिरीक्षक इकबाल महात तपास करीत आहेत.
घोटाळ्यात एकूण चौघांवर गुन्हा दाखल आहे. अधिकाराचा गैरवापर करून बड्या कुळ वापरातील मिळकतधारकांना भाडेकरारानुसार कमी भाडे आकारणी करणे, अनाधिकाराने कर आकारणी कमी करणे, आकारणी निश्‍चित करताना मोठ्या रकमेची सुट देऊन अधिकार मर्यादेचे उल्लंघन करणे, असे आरोप कारंडेसह इतरांवर आहेत. या चौघा संशयितांनी संगनमत करून महापालिकेच्या संगणकीय घरफाळा प्रणालीमध्ये नोंदी घालून त्यामध्ये फेरफार करून महापालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. सन २००४ ते १२ फेब्रुवारी २०२० अखेर हा गुन्हा घडला असून, सुमारे तीन कोटी १४ लाख ६१ हजार ३८ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फियार्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल आहे. घरफाळा घोटाळा आजपर्यंत गाजत आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे या घोटाळ्याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत.