chd65.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chd65.txt
chd65.txt

chd65.txt

sakal_logo
By

गुरव समाजाच्या अधिवेशनाला
चंदगडमधून कार्यकर्ते जाणार

चंदगड, ता. ६ ः राष्ट्रीय गुरव महासंघातर्फे रविवारी (ता. ११) सोलापूर येथील गुरव समाजाच्या अधिवेशनासाठी तालुक्यातून चारशे समाजबांधव उपस्थित राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष विजय गुरव यांनी सांगितले.
गुरव समाजाची लोकसंख्या मोठी आहे. संघटित नसल्याने राज्यकर्त्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. संघटितपणे लढा उभारण्यासाठी अधिवेशन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अधिवेशनात विविध मागण्या मांडल्या जातील. प्राचीन शैव संस्कृती, वेद, पुराण आदींचे संशोधन व संवर्धनासाठी जिल्हास्तरावर दोन हजार चौरस मीटर जागा द्यावी, ज्या देवस्थानचे उत्पन्न नाही तेथील पुजाऱ्याला दरमहा २५ हजार मानधन द्यावे, मंदिरातील उत्पन्नासाठी कायदा करावा. मंगलवाद्य वादक, तुतारी वादकांना दरमहा दहा हजार मानधन द्यावे, मराठा समाजाच्या धर्तीवर संत काशिबा महाराज महामंडळ स्थापन करुन निधी द्यावा. देवस्थान समितीवर गुरव समाजातील प्रतिनिधींची नेमणूक करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. २२ वर्षांनंतर समाजाचे अधिवेशन होत असून त्याला प्रतिसाद दिला जाणार असल्याचे विजय गुरव यांनी सांगितले.