क्षय रूग्णांसाठी प्रोटीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षय रूग्णांसाठी प्रोटीन
क्षय रूग्णांसाठी प्रोटीन

क्षय रूग्णांसाठी प्रोटीन

sakal_logo
By

67181

गरजू क्षय रुग्णांसाठी
प्रोटिन पावडरची मदत

कोल्हापूर, ता. ७ : महापालिकेकडे उपचार घेत असलेल्या ५० क्षयरुग्णांना अथर्वराज एजन्सीजने प्रोटिन पावडरचे डबे दिले. विनायक भोसले, प्रगती भोसले यांनी उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे हे डबे सुपूर्द केले.
महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी २०२५ पर्यंत राज्य क्षयरोगमुक्त करण्यासाठीचा आराखडा तयार केला आहे. गरीब, गरजू क्षय रुग्णांना समाजातील सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींनी पोषण आहारासाठी मदत करण्याचे आवाहन आडसूळ यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत अथर्वराज एजन्सीजने हे प्रोटिन्सचे डबे दिले. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रूपाली दळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरसिंह पवार, सुशांत कांबळे, अभिनय पोळ, प्रवीण क्रूझ, राहुल कदम, स्वप्नील चौगले उपस्थित होते. समाजातील स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शहर क्षयरोग नियंत्रण कार्यालय, ईगल प्राईड बिल्डिंग, मिरजकर तिकटी येथे संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.