वन विभागाचा छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन विभागाचा छापा
वन विभागाचा छापा

वन विभागाचा छापा

sakal_logo
By

67207
गडहिंग्लज : बुधवारी टाकलेल्या छाप्यात सापडलेली छऱ्याची पिस्टल दाखवताना वनविभागाचे अधिकारी. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
--------

टीप वन्यजीव अवशेषांची,
मिळाली छऱ्या‍ची पिस्टल

वनविभागाचा छापा : गडहिंग्लजमधील घराची दोन तास झडती

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ७ : मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आज वनविभागाच्या पथकाने शहरातील कडगाव रोडवरील एकाच्या घराची झडती घेतली. दोन तास चाललेल्या या झडतीतून एकाही वन्यजीवाचे अवशेष मिळाले नाहीत, परंतु छऱ्याची एक पिस्टल मिळाली असून, ती ताब्यात घेतली आहे.
याबाबतची माहिती अशी, की ५ डिसेंबर रोजी वन्यजीवविषयक अपराध घडला असून, संबंधितांच्या घरी वन्यजीव अवशेष असल्याची टीप वन खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी वन विभागाचे पथक शहरात दाखल झाले. टीप देणाऱ्या‍ने सांगितलेल्या ‘त्या’ व्यक्तीच्या कडगाव रोडवरील घरी दुपारी बाराच्या सुमारास या पथकाने छापा टाकला. सरकारी पंचांच्या उपस्थितीत बंद दरवाजाचे कुलूप काढून घरझडती सुरू केली. तिजोरी, पेटीचे कुलूप तोडून काढले असता त्यामध्ये छऱ्‍याची पिस्टल सापडली. त्यानंतर पोटमाळ्याची झडती घेतली, परंतु दोन तासांच्या झडतीत वन्यजीव अवशेषच सापडले नाहीत. या घटनेचा पंचनामा वन विभागाच्या पथकाने केला आहे. या छाप्याची माहिती कळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. शहरात दिवसभर या घटनेचीच चर्चा सुरू होती.
कारवाई केलेल्या पथकात आजऱ्याच्या परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके, गडहिंग्लजचे वनपाल पी. जी. वारंग, बी. बी. न्हावी, एस. के. नीळकंठ यांच्यासह वनरक्षक, वनपाल सहभागी होते. दरम्यान, वन्यजीवविषयक गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास वनविभागाच्या नि:शुल्क हेल्पलाईनवर देण्याचे आवाहन यावेळी डाके यांनी केले.