पर्यावरण अधिकाऱ्यांना दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण अधिकाऱ्यांना दंड
पर्यावरण अधिकाऱ्यांना दंड

पर्यावरण अधिकाऱ्यांना दंड

sakal_logo
By

पर्यावरण अधिकाऱ्यास
पाच हजारांचा दंड
फांद्या तोडण्यास विलंबाबाबत कारवाई
कोल्हापूर, ता. ७ ः ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील झाडाच्या फांद्या तोडण्यास झालेला विलंब व प्रकल्पाच्या संभाव्य नुकसानीचा विचार करून महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांना पाच हजार रुपयांचा दंड केला. ही रक्कम वेतनातून कपात करण्यात येणार असून सेवापुस्तकात नोंद केली जाणार आहे. पर्यावरण अधिकारी असलेल्या व्याघ्रांबरे यांच्याकडे उद्यान अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविलेला आहे. शहरातील पर्यावरणविषयक कामकाजाची जबाबदारी आहे. ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील झाडाच्या फांद्या तोडण्यास झालेल्या विलंबाबाबत गेल्या महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याबाबत त्यांनी केलेला खुलासा अमान्य करून पाच हजार रुपयांचा दंड आकारला. या प्रकारची कारवाई मोठ्या कालावधीनंतर पुन्हा सुरू झाल्याने महापालिका अधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे.