ग्रामपंचायत विश्‍लेषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत विश्‍लेषण
ग्रामपंचायत विश्‍लेषण

ग्रामपंचायत विश्‍लेषण

sakal_logo
By

गडहिंग्लज
अजित माद्याळे

गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला
गडहिंग्लज, ता. ७ : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यामुळे विशेष करुन सरपंच निवडणुकीत साम, दाम, दंड, भेदाचा वापर करुन गावची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय पक्षप्रमुखांची धडपड राहणार आहे. आजच्या माघारीनंतर प्रत्येक गावातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही गावांत गोडसाखर निवडणुकीच्या धर्तीवर आघाड्या आकाराला आल्या आहेत. यामुळे गावच्या निवडणुकाही नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक इच्छुक आपल्या मतदारसंघातील गावांच्या निवडणुकीकडे सेमी फायनल म्हणूनच पाहत आहेत. गावागावांतील मते मिळवून स्वत:ची निवडणूक सोपी करण्यासाठी आपल्या मर्जीतल्या अधिकाधिक सदस्यांना निवडून आणण्याचे त्यांचे नियोजन आहे. गावच्या निवडणुकीत थेट राजकीय पक्षांचा संबंध येत नसला तरी गावपुढारी कोणत्या ना कोणत्या पक्षाशी बांधील असतात. यामुळे पक्षांसह विविध गटही अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपापल्या उमेदवारांना रसद पुरवण्याचा प्रयत्न करतील.