बाजार समिती निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती निवडणूक
बाजार समिती निवडणूक

बाजार समिती निवडणूक

sakal_logo
By

बाजार समिती मतदार यादी जाहीर
२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज ; तांत्रिक पेच कायम

कोल्हापूर; ता. ७ ः शेती उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम न्यायालयाच्या आदेशाच्या आधिन राहूनच राबवला जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज बाजार समितीच्या मतदाराची अंतिम यादी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केली. यात बाजार समितीसाठी २१ हजार ९०५ मतदारांचा समावेश आहे. पुढील निवडणूक नियोजनानुसार २३ ते २९ डिसेंबर कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जातील.
ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार आहेत. त्याची कच्ची यादी बाजार समितीने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे दिली होती. त्यावर हरकती आल्या, सुनावणी झाली. त्यानंतर अंतिम यादी जाहीर झाली. अशात जिल्ह्यातील ६०५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या. ३०३ ग्रामपंचायतीतील सदस्य कोल्हापूर बाजार समितीसाठी मतदार आहेत. त्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्यानंतर नवीन सदस्यांचा बाजार समितीच्या मतदार यादीत समावेश करावा. तोपर्यंत बाजार समिती निवडणुका स्थगित कराव्यात, अशी मागणी करणारी याचिका माजी संचालक ॲड. किरण पाटील व नाथाजी पाटील यांनी दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. मात्र सहकार निवडणूक प्राधिकारणाने यापूर्वी नियोजीत निवडणूक कार्यक्रमानुसार अंतिम यादी जाहीर झाली. बाजार समितीच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीत निवडून येणाऱ्या सदस्यांची नावे बाजार समितीच्या मतदार यादीत समाविष्ठ होणार की नाही याचा पेच मात्र कायम आहे.

जाहीर मतदार यादीतील आकडेवारी
तालुका ः विकास संस्था ः ग्रामपंचायत ः मतदार
---------संस्था ---मतदार
करवीर ----- २५२ ---३१९० ----११८ ---------------१३१९
कागल ------१०५-- १२७६ ------४४---------------४७०
पन्हाळा -----२४७ ---३०३० ----११११-------------१०१४
शाहूवाडी -----९९----१२१६ -----१०६---------------९२२
राधानगरी --- १९९---- २३१७ -----९८----------------८९७
भुदरगड----- २०५ -----२४०४ -----९७----------------८०४
गगनबावडा----- ६८----७८० -------२९---------------२३५

एकूण ------ ११७५-- १४१३३ -----६०३ -------------५६६१

-------------- संस्था ------ मतदार
सहकारी संस्था--११७५ -------१४१३३
ग्रामपंचायत-----६०३ ------५६६१
अडते व्यापारी--------------१२१७
हमाल तोलाई --- ----------८९४
एकूण--------- १७७८ -----२१९०५
----------
नियोजीत निवडणूक कार्यक्रम असा
उमेदवार अर्जाची छाननी - ३० डिसेंबर
वैध उमेदवारी अर्जाची प्रसिध्दी -२ जानेवारी
उमेदवारी मागे घेण्याची मुदत - १६ जानेवारी
उमेदवारी अंतिम यादी व चिन्ह वाटप - १७ जानेवारी
मतदान - २९ जानेवारी
मतमोजणी व निकाल - ३० जानेवारी