Mon, Feb 6, 2023

काटकर जयंती
काटकर जयंती
Published on : 11 December 2022, 6:42 am
रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कोल्हापूर ः रूईकर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीने सद्गुरू ज्ञानेश्वर हरी काटकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १२१ जणांनी रक्तदान केले. राजर्षी शाहू ब्लड बँकेच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मेतके येथील बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष पापा कौलवकर यांच्या हस्ते झाले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी, शाहू ब्लड बँकेचे खजानिस राजीव परीख, निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील आदी उपस्थित होते. जयंतीनिमित्त सकाळी महाअभिषेक, लघुरूद्र, स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ यांच्या वतीने काटकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित भावभक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.