
भडगावात झाले चौथे नेत्रदान
gad91.jpg :
67473
कलाप्पा बंदी
-----------------------------
भडगावात झाले चौथे नेत्रदान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील कलाप्पा रामाप्पा बंदी यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. भडगाव गावातील हे चौथे तर चळवळीतील ८३ वे नेत्रदान ठरले. बंदी कुटुंबीयांच्या या निर्णयामुळे भडगावात चळवळीला गती मिळाली आहे.
भडगावमध्ये २०१५ मध्ये मरणोत्तर नेत्रदान चळवळीची सुरवात झाली. प्रबोधनाच्या पातळीवर काम झाले असले तरी फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दोन वर्षांनंतर एका व्यक्तीचे मरणोत्तर नेत्रदान झाले होते. त्यानंतर तीन वर्षे नेत्रदानाची पाटी कोरीच होती. त्यात दोन वर्षे कोरोनामुळे चळवळीचे काम ठप्पच झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर जानेवारीपासून भडगावमध्ये चळवळीच्या कामाने गती घेतली. आठ महिन्यांत दोन व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले.
दरम्यान, कलाप्पा बंदी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी (ता. ८) सायंकाळी निधन झाले. त्यांचे चिरंजिव अजित बंदी हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांनी वडीलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर येथील अंकुर आय बँकेच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.