
शिंदे हायस्कूलमध्ये क्रीडामहोत्सव
gad92.jpg
67474
गडहिंग्लज : शिंदे हायस्कूलच्या क्रीडामहोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रकाश मोरे यांचा सत्कार करताना डी. व्ही. चव्हाण.
शिंदे हायस्कूलमध्ये क्रीडामहोत्सव
गडहिंग्लज : येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलच्या क्रीडा महोत्सावाचा प्रारंभ झाला. आयर्न मॅन प्रकाश मोरे यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवला. क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. क्रीडा मंत्री गंधर्व सावंत याने क्रीडा शपथ दिली. शासकीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार झाला. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांचेही भाषण झाले. ए. जे. हराडे यांनी स्वागत केले. आर. बी. शिंत्रे यांनी आभार मानले.
---------------------------
अग्निशमन सेवा चार दिवस बंद
गडहिंग्लज : येथील नगरपालिकेतर्फे आपत्तकालीन सेवा पुरवली जाते. मात्र, आपत्तकालीन सेवेकडील अग्निशमन वाहनाच्या दुरुस्तीचे काम करुन घेतले जाणार आहे. उद्यापासून (ता. १०) चार दिवस हे दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे पालिकेकडून पुरवली जाणारी अग्निशमन सेवा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.