शेतकरी श्रीमंत तर देश श्रीमंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी श्रीमंत तर देश श्रीमंत
शेतकरी श्रीमंत तर देश श्रीमंत

शेतकरी श्रीमंत तर देश श्रीमंत

sakal_logo
By

gad93.jpg
67475
औरनाळ : रावसाहेब कित्तूरकर महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरात बोलताना प्रदीप मुरकीभावी.
------------------------
शेतकरी श्रीमंत तर देश श्रीमंत
प्रदीप मुरकीभावी : ‘कित्तूरकर’च्या श्रमसंस्कार शिबिरात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : आजच्या शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्‍टि ष्टीकोनातून पाहिले पाहीजे. शेती प्रगत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण नियंत्रण, नैसर्गिक साधनांचा वापर केला पाहिजे. शेतकरी श्रीमंत झाला तरच देश श्रीमंत होणार आहे, असे प्रतिपादन कृषी विभागाचे कनिष्ठ संशोधक सहायक प्रदीप मुरकीभावी यांनी केले.
औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथे रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे. या वेळी झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. मलगोंडा पाटील अध्यक्षस्थानी होते.
सरपंच संदीप पाटील, उपसरपंच शिवाजी सावंत, अभिजित पाटील, एम. एस. चौगुले, तानाजी भोसले, आण्णासाहेब भोसले, भीमराव कोकाटे, आप्पा बागी, प्राचार्य विजय चौगुले, उपप्राचार्या अनिता चौगुले आदी उपस्थित होते. सहायक प्रकल्प अधिकारी प्रा. सुरेश घस्ती यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. आर. बाडकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्प अधिकारी प्रा. एन. व्ही. गावडे यांनी आभार मानले.