प्रा. गणपती यादव यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. गणपती यादव यांना पुरस्कार
प्रा. गणपती यादव यांना पुरस्कार

प्रा. गणपती यादव यांना पुरस्कार

sakal_logo
By

67606
....
प्रा. जी. डी. यादव यांची
‘एनएआय’ फेलो म्हणून निवड

सन्मान मिळविणारे आतापर्यंतचे दुसरे भारतीय

कोल्हापूर, ता. ९ ः मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान (आयसीटी) संस्थेचे माजी कुलगुरू प्रा. जी. डी. यादव यांची यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स (एनएआय) चे फेलो म्हणून निवड झाली. असा सन्मान मिळविणारे ते दुसरे भारतीय आहेत. २०१६ साली त्यांचा ‘पद्मश्री’ने सन्मान झाला आहे.
‘एनएआय’ची स्थापना युएस पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडून पेटंट जारी केलेल्या शोधकांना निवडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, शैक्षणिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेची दृश्यमानता वाढवण्यासाठी करण्यात आली. त्याचबरोबर बौद्धिक संपत्तीच्या प्रकटीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, नावीन्यपूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षित व मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शोधांचे उद्योगात परिवर्तन करण्यासाठीही प्रयत्न केले जातात. अशी पेटंट समाजाच्या फायद्यासाठी उपयोगी असली पाहिजेत.
प्रा. यादव हे १२० पेटंटसचे शोधक आहेत. अलीकडेच त्यांनी एका डॉलरपेक्षा कमी किमतीत पाण्याचे विभाजन करून ग्रीन हायड्रोजन, कार्बन डाय ऑक्साईडचे मूल्यीकरण इंधन आणि मिथेनॉल, डायमिथाइल इथर, मिथेन आणि उच्च हायड्रोकार्बन्स यांसारख्या रसायनांमध्ये आणि कचऱ्यापासून चौदा विविध मूल्यवर्धित रसायनांमध्ये रुपांतर करण्याचे संशोधन केले आहे. ‘पेटंटचे जनक’ म्हणून त्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या ग्रीन हायड्रोजनच्या कामाला ‘ओएनजीसी’ एनर्जी सेंटरचा पाठिंबा आहे. काल त्यांची आयआयटी गुवाहाटी येथे बायोटेक रिसर्च सोसायटी इंडियाचे मानद फेलो म्हणून नियुक्ती करण्यात आली. गेल्या महिन्यांत एमआयटी एडीटी विद्यापीठाने त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीचा पहिला भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार देऊन गौरव केला आहे. दोन ऑक्टोबरला वॉशिंग्टनमधील यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्येही त्यांना फेलोचा सन्मान मिळाला. अकादमीच्या संपूर्ण इतिहासात केवळ एकवीस भारतीय नागरिकांना या अकादमीमध्ये सामील करण्यात आले आहे. प्रा. यादव यांनी १०७ पीएच.डी., १३५ मास्टर्स आणि ४८ पोस्ट-डॉक्टरेटना मार्गदर्शन केले आहे. जगभरात नऊशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. ‘आयओसीएल’च्या सहाय्याने भुवनेश्वर आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने जालना येथे दोन नवीन कॅम्पस त्यांनी स्थापन केले. केंद्र सरकारच्या अनेक समित्या आणि धोरण निर्मात्या संस्थांवर ते कार्यरत आहेत. ते सध्या महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेससह इंडियन केमिकल सोसायटी आणि एसीएस इंडिया इंटरनॅशनल चॅप्टरचे अध्यक्ष आहेत.