निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

67564
प्रदीप लिमये
कोल्हापूर : साळोखेनगर रोड, साने गुरुजी वसाहतीतील प्रदीप शंकरराव लिमये (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

67567
धनाजीराव जाधव
कोल्हापूर : ममदापूर (ता. भुदरगड) येथील धनाजीराव भैरू जाधव (वय ६६) यांचे निधन झाले. ते पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ मुंबईचे सचिव म्हणून कार्यरत होते. राष्ट्रीय कबड्डीपटू, वेटलिफ्टर होते. त्यांच्या मागे पत्नी, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

67568
सुभद्रा विचारे
कोल्हापूर : कृष्णानंद कॉलनी, कसबा बावडा येथील श्रीमती सुभद्रा वसंत विचारे (वय 79) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे

67587
अविनाश भुयेकर
कोल्हापूर : राजोपाध्ये गल्ली, महाद्वार रोडवरील अविनाश बापूराव भुयेकर (वय ७९) यांचे निधन झाले. सिंडिकेट बँकेचे ते निवृत्त व्‍यवस्थापक होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

67655
अनिल लक्षापती
कोल्हापूर : हातकणंगलेतील अनिल भालचंद्र लक्षापती (वय ६८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १०) आहे.

02984
सागर गोंधळी
उजळाईवाडी : गडमुडशिंगी येथील सागर आदिनाथ गोंधळी (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १०) आहे.

ich95.jpg
67646
रायगोंडा पाटील
इचलकरंजी : येथील भूविकास बँकेचे माजी व्यवस्थापक रायगोंडा बसगोंडा पाटील (वय 82) यांचे निधन झाले. पत्रकार शीतल पाटील यांचे ते वडील होत. माती सावडणेचा विधी शनिवारी (ता.10) स. 9. 30 वाजता लिंगायत रुद्रभूमीत आहे. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

67633
गणपती कांबळे
गडहिंग्लज : कोळिंद्रे (ता. आजरा) येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक गणपती रामा कांबळे (वय 83) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा बँकेच्या किणे शाखेचे शाखाधिकारी विजय कांबळे यांचे ते वडील होत. जलदान विधी रविवारी (ता. 11) आहे.

01551
शिवाजीराव चव्हाण-पाटील
बिद्री : येथील निवृत्त कॅप्टन शिवाजीराव दत्ताजीराव चव्हाण-पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांनी बिद्री साखर कारखान्याचे सिक्युरिटी ऑफिसर म्हणूनही सेवा बजावली होती. सिव्हील इंजिनिअर पृथ्वीराज चव्हाण यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १२) आहे.

03913
बाहुबली पाटील
कुंभोज ः येथील बाहुबली रायगोंडा पाटील (वय ३६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १०)आहे.

02202
मनोरमा सुकये
चंदगड : येथील तानाजी गल्लीतील मनोरमा विजय सुकये (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, चार विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक राजाराम सुकये यांच्या त्या आई होत.

02384
आनंदीबाई भगत
नागाव : वडीये रायबाग (ता. कडेगांव, जि. सांगली) येथील आनंदीबाई उत्तम भगत ( वय ८०) यांचे निधन झाले. शिरोली औद्योगिक वसाहतीतील कोहिनूर मेटॅलिक्सचे मालक व उद्योजक संजय भगत यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ११) वडीये रायबाग येथे आहे.