
कॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. परशराम पाटील यांची भेट
कॉमर्स कॉलेजला आंतरराष्ट्रीय कृषी
अर्थतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांची भेट
कोल्हापूर ः येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयास कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी भेट दिली. या वेळी झालेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना त्यांनी ‘भारतीय कृषी निर्यात धोरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम घाटामध्ये काजू, मध, ऊस, फूल आणि पर्ण शेतीला खूप महत्त्व आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनीतला कस आणि पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास आपल्याकडे असणाऱ्या कच्च्या मालालाही आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उपलब्ध आहे.’’ कृषी उद्योग आणि पर्यावरण यामधील संबंध स्पष्ट करत भारत सरकारच्या वेगवेगळ्या कृषी निर्यात धोरण आणि योजनांची माहिती दिली.’’
प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विधी विभागप्रमुख प्रा. अतुल जाधव यांनी प्रास्ताविक केले. आभार उपप्राचार्य प्रा. बी. टी. नाईक यांनी मानले.