फुल निर्यात बंदच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुल निर्यात बंदच
फुल निर्यात बंदच

फुल निर्यात बंदच

sakal_logo
By

पॉलिहाऊस व्यवसाय कोमजला
फुले निर्यातीला खीळ; परराज्यात मागणी कायम

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः येथील जिल्ह्यातील हवामान चांगले असल्याने शेती उत्पादनात जिल्हा अग्रेसर आहे. त्यालाच जोड व्यवसाय म्हणून अनेकांनी पॉलिहाऊस सुरू केली. फुलोत्पादन सुरू झाले. त्याची निर्यातही होऊ लागली. गेल्या काही वर्षात कोरोना संकट, शासकीय अनुदानातील कपात, काही निर्यादार एजंटाची चालबाजी आदी कारणातून पॉलिहाऊस व्यवसाय धोक्यात आला. परिणामी फुलांची परदेशी निर्यात थंडावली.
ज्या पॉलीहाऊसवाल्यांचे नुकसान झाले त्यांना शेतीपिक नुकसान भरपाई किंवा कर्ज माफीत समावेश नसल्याने भरपाई मिळत नाही. निर्यात बंद झाल्याने फुलांना पुरेसा भाव मिळत नाही. यातून पॉलिहाऊस व्यवसाय वाढीला खीळ बसली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १२०० हून अधिक पॉलिहाऊ पैकी सद्या जेमतेम ३५० वर नोंदणीकृत पॉलिहाऊस शिल्लक आहेत. अशा स्थिती या व्यवसायाला नव्याने उभारी देण्याची गरज आहे.
२००० ते २००५ या कालावधीत जिल्हाभरात पॉलिहाऊसची संख्या १२०० च्या आसपास होती. रोज दिड पाच ते सहा टन फुलांची उत्पादन बड्या शहरात तसेच परदेशात निर्यात होत होती. मात्र सद्या जिल्ह्यात अपवाद वगळता फुलांची निर्यात थंडावली आहे, तर काही पॉलिहाऊस धारकांनी गुणवत्तापूर्ण फुलांचे उत्पादन घेणे सुरू ठेवले आहे, त्यांची फुले हैदराबाद, दिल्ली, बडोदा, अहमदाबाद, जयपूर अशा बड्या शहरातील पंचतारांकीत हॉटेल तसेच शाहीसंमारंभाच्या सजावटीसाठी कोल्हापूरातून जातात. हे प्रमाण सद्या नगन्य झाले आहे.

कोट
रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या. शासकीय अनुदानातील सबसिडी जैसे थेच आहे. कोरोनाकाळात फुलांची मागणी घटली, अतिवृष्ठी वादळ, महापूरकाळात पॉलिहाऊसमध्ये मजूर येऊ शकले नाहीत. याकाळात लागवड केलेल्या रोपांची वाढ, फुलधारणेचे नियोजन बिघडले. उत्पादन घटले, दोन वर्षाचे फुलांची मागणी कमी झाली. पण खर्च सुरू होताच. यात कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. परिणामी पॉलिहाऊस नुकसानीत गेली.
-दिपक पाटील, पॉलिहाऊसधारक

चौकट
जिल्‍ह्यातील पॉलिहाऊस...
खासगी- ६००
शासकीय अनुदानीत-३७०
बंद अवस्‍थेतील- ३००
निर्यात क्षमतेची- ५
अवलंबित घटक- ५०००
फुलांचे प्रकार- ४२