जीवनदान सेवाभावी संस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनदान सेवाभावी संस्था
जीवनदान सेवाभावी संस्था

जीवनदान सेवाभावी संस्था

sakal_logo
By

67598

‘त्या’ वृद्ध व्यक्तीच्या नातेवाईकांनी
संपर्क साधण्याचे आवाहन


कोल्हापूर ः दोन दिवसांपूर्वी लक्ष्मीपुरी परिसरात ६५ वर्षीय वृद्ध बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती जीवदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. या व्यक्तीला तत्काळ उपचार मिळाल्यामुळे या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांना नाव व पत्ता विचारल्यानंतर त्यांनी बाबासाहेब पाटील, गाव हिडलगे असे सांगितले. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज मिळाला. आणि ते पुन्हा सीपीआर रुग्णालय परिसर, टाऊन हॉल व दसरा चौक परिसरातून फिरत आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी ‘जीवदान’ संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन खोडवे यांनी केले. या मोहिमेत नुरूल मोमीन, वसंत लिंगनूरकर, अक्षय बागडी, नीलेश शेणवी, नुरूल मोमीन व अकबर मौलवी यांनी परिश्रम घेतले.