मेंढोली ग्रामपंचायत हायटेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेंढोली ग्रामपंचायत हायटेक
मेंढोली ग्रामपंचायत हायटेक

मेंढोली ग्रामपंचायत हायटेक

sakal_logo
By

ajr91.jpg.....
67577
मेंढोली (ता. आजरा) ग्रामपंचायतीने पावतीवर छापलेला क्युआर कोड.
-------------------
मेंढोली ग्रामपंचायत हायटेक
ऑनलाईन घरफाळा, पाणीपट्टी वसुली; तालुक्यात पहिला प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ ः धावपळ व धकाधकीच्या या काळात माणसांकडून ऑनलाईनचा वापर वाढला आहे. वीज, दूरध्वनी व अन्य बिल भरण्याबरोबर खरेदीसाठीही गुगल पे, फोन पे, युपीआय यासह विविध ऑनलाईन सुविधांचा वापर होत आहे. आजरा तालुक्यातील मेंढोली ग्रामपंचायतीने घरफाळा व पाणीपट्टी वसुली ऑनलाईन पेंमेंटद्वारे सुरू केली आहे. तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग असून याला ग्रामस्थांतून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे वेळ व पैशांची बचत होत आहेच त्याचबरोबर ग्रामस्थांना घरात बसून घरफाळा व पाणीपट्टीचे बिल भरणे शक्य झाले आहे.
ग्रामपंचायतीने बिल पावतीवर क्युआरकोड छापण्याचा पहिला प्रयोग केला. तो स्कॅन करून घरात बसून घरफाळा व पाणीपट्टी ग्रामस्थ भरू लागले आहेत. महाराष्ट्र बॅंक प्रशासनाकडून ई-स्टेटमेंट आठवड्याला ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावर (मेलवर) मिळते. त्यामुळे कुणी ऑनलाईन घरफाळा भरला हे समजते. त्यानंतर ग्रामपंचायत घरफाळा, पाणीपट्टीची पावत्या करते. बॅंकेत घरफाळा व पाणीपट्टीसाठी ग्रामपंचायतीची दोन खाती आहेत. पावतीची प्रिंट काढून ती संबंधित ग्रामस्थांच्या घरी प्रशासनाकडून पाठवली जाते. महिनाभरापासून ऑनलाईन वसुलीला सुरुवात झाली आहे. झालेल्या वसुलीमध्ये पन्नास टक्के वसुली ऑनलाईन पेमेंटने झाली आहे. यामुळे वेळ व पैशांची बचत होण्याबरोबर पारदर्शकता आली आहे. या गावातील बहुतांश जण मुंबई व पुणे येथे नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक असल्याने त्यांना याचा चांगला उपयोग झाला आहे. ग्रामस्थांना वेळेत घरफाळा व पाणीपट्टी भरता येत असल्याने कटू प्रसंग टाळणे शक्य आहे. गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी हा उपक्रम सर्व ग्रामपंचायतींनी राबवावा अशी सूचना केली आहे.
-----------
घरफाळा व पाणीपट्टी ऑनलाईन भरल्यामुळे कारभारामध्ये पारदर्शकता आली आहे. ग्रामस्थांचा वेळ व पैसा बचत होत असल्याने त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे, मुंबई अशा बाहेरगावी स्थायिक असलेल्या ग्रामस्थांची सोय झाली आहे. त्यांच्याकडून समाधानाची भावना आहे.
-अॅड. लक्ष्मण गुडुळकर, सरपंच
- वैभव गुरव, ग्रामसेवक