दररोज २५ ते ३० लाख जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दररोज २५ ते ३० लाख जमा
दररोज २५ ते ३० लाख जमा

दररोज २५ ते ३० लाख जमा

sakal_logo
By

इचलकरंजी महापालिका वापरणे
-----------------
मनपाचा घरफाळा वसुलीचा धमाका
दररोज सुमारे ३० लाख जमा; ३१ डिसेंबरपर्यंत मुदत
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ ः घरफाळा भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. त्यानंतर संयुक्त करावर २ टक्के दंडाची आकारणी केली जाते. त्यामुळे हळूहळू घरफाळा भरण्यासाठी महापालिकेच्या कर विभागात मिळकतधारकांची गर्दी होत आहे. सध्या दररोज साधारणपणे २५ ते ३० लाखांपर्यंत घरफाळा जमा होत आहे. आतापर्यंत २६ टक्के वसुली झाली आहे. त्यानुसार १७ कोटी ६६ लाख महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. यंदा फारशी आपत्तीजनक परिस्थिती नसल्यामुळे चांगल्याप्रकारे घरफाळा जमा होईल, अशी प्रशासनाला आशा आहे. महापालिका झाल्यामुळे यंदाच्या घरफाळा वसुलीला विशेष महत्त्व असणार आहे.
दोन वर्षे कोरोनाचे संकट होते. तर गेल्यावर्षी महापुराच्या आपत्तीमुळे मिळकतधारकांचे आर्थिक नियोजन कोलमडत होते. कोरोनाचे संकट दूर झाले आहे. सुदैवाने यंदा महापुराची झळ बसली नाही. सर्व उद्योग, व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. सण, उत्सव, कार्यक्रम जल्लोषात साजरे होत आहेत. विवाह सोहळे धुमधडाक्यात साजरे होत आहे. त्यातून मोठी आर्थिक घडामोड होत आहे. छोटे - मोठे व्यावसायिक उभारी घेत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम, घरफाळा वसुलीवर यंदा होताना दिसत आहे. ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे; पण आतापासूनच घरफाळा भरण्यासाठी नागरिकांची कर विभागात गर्दी होत आहे.
सध्या पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन घरफाळा भरण्याबाबत आवाहन करीत आहेत. मिळकतधारकांकडून त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. दररोज सरासरी २५ ते ३० लाखांचा घरफाळा जमा होत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दररोज ५० लाखांपर्यंत घरफाळा जमा होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर मात्र प्रत्येक महिन्याला संयुक्त करावर २ टक्के दंड आकारणी केली जाणार आहे. पुढील काळात विशेष वसुली मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी कर विभागाकडून सुरू केली आहे. सध्या शहरातील मिळकतधारकांची संख्या ५९ हजार आहे. खुल्या मिळकती ५ हजार आहेत.
------
ऑनलाईन भरण्याला प्रतिसाद
यंदा कर विभागाने घरफाळा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी या वर्षीपासून नवीन सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. परिणामी, अनेक मिळकतधारकांनी घरबसल्या घरफाळा भरण्यास प्राधान्य दिले आहे. सरासरी दररोज १ लाख ते १ लाख २५ हजार इतका ऑनलाईन घरफाळा जमा होत असल्याची माहिती कर अधिकारी आरिफा नुलकर यांनी दिली.
------
घरफाळा वसुली दृष्टिक्षेप (ग्राफ करणे)
चालू मागणी - ४४ कोटी ६७ लाख
थकबाकी - २२ कोटी ६० लाख
थकबाकी वसुली - ७ कोटी २६ लाख
चालू मागणी वसुली - १० कोटी ४० लाख
एकूण वसुली - १७ कोटी ६६ लाख