सेवानिवृत्तांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्तांचा सत्कार
सेवानिवृत्तांचा सत्कार

सेवानिवृत्तांचा सत्कार

sakal_logo
By

67615

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
कोल्हापूर, ता. ९ : महापालिकेच्या विविध विभागांतील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या हस्ते आभार पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ३० नोव्हेंबरला निवृत्त झालेल्यांचा सत्कार करण्याची सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली होती. त्यानुसार आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम झाला. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. यामध्ये बाबूराव दबडे, छाया ठाकर, कुमार शिरदवाडे, भूपाल कुंडले, हारुण सदलगे, संजय माने यांचा सत्कार करण्यात आला.
उपायुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, प्रा. फंड अधीक्षक उमाकांत कांबळे व प्रा. फंड विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.