Tue, Feb 7, 2023

अंबाबाई मंदिर एकास अटक
अंबाबाई मंदिर एकास अटक
Published on : 9 December 2022, 5:51 am
चप्पल स्टँडचालकाकडून विनयभंग
कोल्हापूर ः करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टँडचालकाने महिलेचा विनयभंग केला. त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेल्यावर तेथेही त्याने पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे सरकारी कामात अडथळ्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश भूपाल पाखरे (वय ४२, रा. संभापूर, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक केल्यावर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले. गुरुवारी (ता. ८) हा प्रकार घडला असून, याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.