आजरा ः जनता गृहतारण संस्था बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः जनता गृहतारण संस्था बातमी
आजरा ः जनता गृहतारण संस्था बातमी

आजरा ः जनता गृहतारण संस्था बातमी

sakal_logo
By

ajr१०१.jpg.....
67717
मारुती मोरे
-------------
जनता गृहतारण संस्थेला
राज्य कार्यक्षेत्राची मंजुरी
आजरा, ता. १० ः माणसं जोडणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या आजऱ्यातील जनता सहकारी गृहतारण संस्थेला राज्य कार्यक्षेत्राची मंजुरी मिळाली. संस्थाध्यक्ष मारुती मोरे यांनी याबाबत माहिती दिली.
श्री. मोरे म्हणाले, ‘सप्टेंबर २००१ मध्ये संस्थेची स्थापना झाली. सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या संस्थेची राैप्यमहोत्सवाकडे वाटचाल सुरु असताना संस्थेला राज्य कार्यक्षेत्र मिळाले. राज्य कार्यक्षेत्र मिळवणारी एकमेव सहकारी गृहतारण संस्था म्हणून जनता सहकारी गृहतारण संस्था आेळखली जाईल. सुरुवातीला आजरा तालुकाच कार्यक्षेत्र होते. वाढती विश्वासार्हता लक्षात घेत संचालक मंडळाने कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र करवून घेतले. कर्जदारांची वाढती मागणी लक्षात घेऊन सांगली, सातारा जिल्हा कार्यक्षेत्रही मिळवले. सामान्यांचे स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणणारी संस्था असा लाैकिक असणाऱ्या संस्थेने सतत आॅडिट वर्ग ‘अ’ मिळवला. याची दखल घेत संस्थेला महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्रासाठी सहकार विभागाकडून परवानगी मिळाली. याकामी पुणेचे सहकार आयुक्त तथा निबंधक अनिल कवडे, अप्पर निबंधक धनंजय डोईफोडे, कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, मुख्य अधीक्षक उदय उलपे, अधीक्षक महेश शेलार यांचे सहकार्य लाभले. हितसंबंध न सांभाळता सभासदांचे हित ठेवून संस्था कार्यरत आहे.’