राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’ राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’ राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’
राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’


राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’
राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’ राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’ राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’

राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’ राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’ राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरूणोदय’

sakal_logo
By

डोके ः वारणा दूध संचालक अरुण पाटील वाढदिवस विशेष (...8 कॉलम रंगीत पट्टी)

ich111, 2.jpg
67782
67783

राजकीय, सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ‘अरुणोदय’

कुंभोज (ता. हातकणंगले) चे सुपुत्र, वारणा दूध संघाचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण बाबासाहेब पाटील यांचा उद्या (ता. १२) ५६ वा वाढदिवस. त्यानिमित्त...
------------
जन्मत:च राजकीय वसा व वारसा लाभलेले अरुण पाटील हे पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व बाहुबली एण्डोमेंट ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र. वडिलांचा समाजकारण व राजकारणाचा वारसा त्यांनी पुढे चालवला आहे. अरुण नावाप्रमाणे त्यांच्या राजकीय व सामाजिक कर्तृत्वाने गावासह परिसराचा ‘अरुणोदय’ केला आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत बंधू अनिल पाटील यांची मोलाची साथ लाभली आहे.
प्रत्येक माणसाची माणुसकी या नात्याने होणारी विचारपूस, माणसे जोडण्याची आणि ती टिकविण्याची वारसा हक्काने मिळालेली अंगभूत कला, अवघे जीवन आरपार पारदर्शक ठेवण्याची स्वभावशैली, सदैव प्रसन्न व्‍यक्तिमत्त्‍व, लोकांमध्ये मिसळणारे आणि लोकांच्या समस्या जाणून घेतानाच त्या सोडवण्यासाठी असलेली धडपड, त्यामुळे समाजाशी खूप काही देणे घेणे आहे, अशा रितीने वागणारे एक साधे, सरळ आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्‍व म्हणून अरुण बाबासाहेब पाटील यांची ओळख.
बाविसाव्या वर्षांपासून वीर सेवा दलाच्या माध्यमातून समाजकार्याची सुरुवात केली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आणि युवकांमध्ये कुशल संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि त्यांनी ती चांगल्या मताधिक्याने जिंकलीही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाबरोबरच अनेक लाभाच्या योजना लाभार्थ्यांच्या दारापर्यंत नेऊन पोचवल्या. सध्या कुंभोजमध्ये सहा पाणीपुरवठा, तीन विकास संस्था असून त्यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी कुंभोज दूध संस्थेची स्थापना केली. दुधाच्या पैशातून सभासदांना बचतीची सवय लागावी यासाठी कुंभोज ग्रामीण सहकारी पतसंस्था स्थापन केली.
माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षात सक्रिय भाग घेत माजी आमदार राजीव आवळे यांच्या विजयात मोठे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन माजी मंत्री श्री. कोरे यांनी त्यांना दूध संघाचे संचालकपद बहाल केले. वारणा दूध संघाच्या संचालक मंडळात सलग तिसऱ्‍यांदा त्यांची बिनविरोध निवड झाली. वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदीही त्यांनी निवड झाली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून भविष्यात परिसरातील विविध समस्यांच्या निवारणासाठी प्रयत्न करणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्मारक व्हावे या उदात्त हेतूने त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे नेले. यांसह शेतकऱ्‍यांच्या मालाला रास्त भाव मिळावा म्हणून त्यांनी वाठारसह परिसरातील गावात रास्ता रोको आंदोलनही केले. कुंभोजसारख्या मोठ्या गावात परिसरातील गावाप्रमाणे मोठ्या प्रमाणात उरूस व यात्रा भरावी तसेच मोठ्या प्रमाणात करमणुकीचे कार्यक्रम व्हावेत, अशी श्री. पाटील यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत, गावातील सर्व तरुण व सामाजिक कार्यकर्ते त्यांना एकत्र करून इच्छा प्रकट केली. याला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. सर्व समाज समावेशक उरूस व यात्रा कमिटी तयार केली. गावकऱ्‍यांच्या आग्रहास्तव त्यांनी उरूस व यात्रा कमिटीचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले. अशा या उद्योन्मुख नेतृत्वाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

पुरवणी संकलन
राजू मुजावर, कुंभोज