चंद्रकांतदादा पाटील निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांतदादा पाटील निषेध
चंद्रकांतदादा पाटील निषेध

चंद्रकांतदादा पाटील निषेध

sakal_logo
By

‘भाजपकडून महापुरुषांच्या
बदनामीची मालिका’

कोल्हापूर, ता. ११ ः महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामीची मालिका भाजपने सुरू केली आहे. त्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भर घातल्याने त्यांचा जाहीर निषेध करत असल्याचे पत्रक कॉंग्रेसच्या प्रदेश महिला सचिव भारती पोवार यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी स्वतःच्या खिशातील पैसे जनतेच्या शिक्षणासाठी घातले. सधन असलेल्या महात्मा फुले यांनी आपली संपत्ती लोककल्याणासाठी खर्च केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकवर्गणीतून रयत शिक्षण संस्था उभी केली. लोकवर्गणी व भीक यातील फरक मंत्री पाटील यांनी माहीत आहे का? डॉ. आंबेडकरांनी समाजव्यवस्थेने पिचलेल्या समाजासाठी स्वबळावर संस्था उभी केली. हैदराबादच्या निजामाकडून कर्ज काढले. त्याची परतफेड महापरिनिर्वाणानंतरही करण्यात आली होती.