
लोकल टेम्पोधारकास दर वाढ द्यावी
ich116.jpg
67792
इचलकरंजी : स्थानिक टेम्पोधारकास दरवाढ द्यावी, या मागणीचे निवेदन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनला दिले.
स्थानिक टेम्पोधारकास दरवाढ द्यावी
‘टेम्पोचालक कल्याणकारी’तर्फे पॉवरलूम असोसिएशनला निवेदन
इचलकरंजी, ता. ११ : डिझेल दरवाढ, वाढत चाललेले इन्शुरन्स पासिंग, मेटेन्सेस, स्पेअर व मिस्त्रीची मंजुरी यामध्ये वाढ होत असल्याने शहर सर्व मालक व कारखानदार असोसिएशनकडून स्थानिक टेम्पोधारकास दर वाढवून मिळावेत, या मागणीचे निवेदन टेम्पोचालक कल्याणकारी असोसिएशनतर्फे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडे दिले.
व्यवसायामध्ये उत्पन्न कमी झाल्याने कामगार ठेवणे, त्याचा पगार देणे कठीण आहे. त्यामुळे स्थानिक वाहनधारकास पूर्वीपेक्षा वाढलेल्या ताग्याचे वजन व मीटर लक्षात घेता मजुरीवाढ मिळावी. सरासरी ४५ ते ५५ टक्यांपर्यंत दरवाढ करावी. गोडावूनमधून बाचकी न मिळाल्यास किंवा कोणतेही काम न मिळता परत आल्यास २०० रुपये भाडे द्यावे. तागे किंवा बाचकी दोन ठिकाणी भरल्यास किंवा उतरवल्यास सरासरी जादा भाडे द्यावे. रस्त्यावरील गर्दीचा विचार करून कोणतेही काम सायंकाळी पाचपर्यंत, अन्यथा सकाळी नऊनंतर सांगावे. दरवाढ १ डिसेंबरपासून मिळावी, अशा मागण्या नमूद केल्या आहेत. शिष्टमंडळात मिश्रीलाल जाजू, शामराव पवार, रामू हिरेमठ, धनाजी सूर्यवंशी, तानाजी माने आदी उपस्थित होते.