गडहिंग्लज, शिवराज स्कुलची घौडदौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज, शिवराज स्कुलची घौडदौड
गडहिंग्लज, शिवराज स्कुलची घौडदौड

गडहिंग्लज, शिवराज स्कुलची घौडदौड

sakal_logo
By

67830
गडहिंग्लज : गारगोटीच्या शाहू कुमार भवन विरूध्द शिवराज स्कुल सामन्यातील चुरशीचा क्षण.

गडहिंग्लज, शिवराज स्कुलची घौडदौड
डॉ. घाळी फुटबॉल लिग; केदारी रेडेकर स्कुलची आगेकूच
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : डॉ. घाळी शालेय फुटबॉल लिगमध्ये सतरा वर्षे गटात गडहिंग्लज हायस्कुल आणि शिवराज इंग्लिश मिडियम स्कुलने आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून घौडदौड सुरू ठेवली. केदारी रेडेकर पब्लिक स्कुलने साधना हायस्कुल ब संघावर मात करून आगेकूच केली. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
गडहिंग्लज हायस्कुलने लिगमध्ये तिसरा विजय मिळवित केदारी रेडेकर स्कुलला ६-१ असे हरविले. भरवशाचा खेळाडू सुमित कांबळेने खाते उघडले. पाठोपाठ संस्कार गवळी, यश पाटील, विनायक गोंधळी, अर्थव कांबळेने गोल करून मोठा विजय मिळवून दिला. रेडेकर स्कुलतर्फे गोल करणारा प्रथम कमते, सौरभ मोहितेची लढत व्यर्थ ठरली.
जागृती हायस्कुलने गारगोटीच्या शाहु कुमार भवनवर ५ गोलनी सहज मात केली. आर्यन दळवीने तीन तर शुभम राठोड, हर्षल कुरळेने प्रत्येकी एक गोल केला. तिसऱ्या सामन्यात रेडेकर स्कुलने साधना हायस्कुल ब संघाचा आठ गोलनी धुव्वा उडविला. रेडेकरच्या प्रथम आणि सौरभ यांनी प्रत्येकी तीन गोल करत सिंहाचा वाटा उचलला. शेवटच्या सामन्यात शिवराज स्कुलने शाहू कुमार भवनला एका गोलने नमविले. शिवराजच्या श्रीवर्धन म्हैत्रीने निर्णायक गोल केला.
-----------------
चौकट
तीन हैटट्रिक
जागृतीचा आर्यन दळवीने स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या हैटट्रिकची नोंद केली. नवोदित शाहू कुमार भवन विरूध्द ही त्याने कामगिरी केली. तसेच केदारी रेडेकर स्कुलचा प्रथम कमते, सौरभ मोहितेने साधना ब विरुध्द हैटट्रिक नोंदवली.