
गडहिंग्लजला आज रक्तदान
गडहिंग्लजला आज रक्तदान
गडहिंग्लज : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या (ता. १२) सकाळी नऊपासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कडगाव रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हे शिबिर होणार आहे. अधिकाधिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन रक्तदान शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.
--------------------------------------------------------------
GAD114.JPG
67834
नूल : तालुकास्तरीय काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरणप्रसंगी विलास कुलकर्णी, प्राचार्य जे. डी. वडर, नागेश चौगुले आदी.
काव्यवाचन स्पर्धेस प्रतिसाद
नूल : येथील पुष्पावती चौगुले विश्वस्त संस्था व न्यू इंग्लिश स्कूलतर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय काव्य वाचन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निवृत्त गटविकास अधिकारी शरद चौगुले यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेचा निकाल असा ः मधुरा थोरात, सुनंदा माने (न्यू इंग्लिश नूल), प्रेरणा भूजंग (न्यू इंग्लिश कौलगे), मृणाल देसाई (वि. दि. शिंदे गडहिंग्लज), नंदिनी पाटील (न्यू इंग्लिश स्कूल नूल), अनिषा पुजारी (वि. दि. शिंदे गडहिंग्लज), स्वामिनी काटकर (न्यू इंग्लिश कौलगे). प्रकाश चौगुले, प्रा. बसवराज मगदूम, युवराज गायकवाड यांनी परीक्षण केले. विलास कुलकर्णी, प्राचार्य जे. डी. वडर, एस. आर. काळे, नागेश चौगुले, सचिन रेडेकर यांच्याहस्ते बक्षिस वितरण झाले. यावेळी शि. नि. हंचनाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झालेल्या सुलेखन स्पर्धेत कुमार विद्या मंदिर, कन्या विद्यामंदिर, रामपूरवाडी विद्या मंदिरमधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण झाले.
------------------------------------------------------------------------
रक्तदान शिबिरास प्रतिसाद
गडहिंग्लज : शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष अवधूत परीट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास प्रतिसाद मिळाला. पदाधिकारी व सदस्यांनी रक्तदान केले. शिवसह्याद्री प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे जिल्हाध्यक्ष विनायक इंदुलकर यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष शाहीद खणदाळे, अशोक परीट, संघराज विटेकरी, सतीश भोगाणे, शिवशंकर हिरेमठ आदी उपस्थित होते.