
शरण मेळाव्यात हजारो संख्येने सहभागी व्हा
67849
गडहिंग्लज : शरण मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रवचनात ध्वजारोहणप्रसंगी बाबासाहेब वाघमोडे, दिनेश पारगे, गंगामाताजी, बसवरत्नमाताजी, अनिमेषानंद स्वामीजी.
शरण मेळाव्यात हजारो
संख्येने सहभागी व्हा
---
जगद्गुरू गंगामाताजी; गडहिंग्लजमधील सभेत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : कुडलसंगम (जि. बागलकोट) येथे बसवधर्मपीठातर्फे १२ ते १४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ३६ व्या शरण मेळाव्यात गडहिंग्लज परिसरातील लिंगायत बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जगद्गुरू गंगामाताजी यांनी येथे केले.
शरण मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील महालक्ष्मी मंदिरात आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमापूजनाने व ध्वजारोहणाने प्रवचनाची सुरुवात झाली. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन, तर तहसीलदार दिनेश पारगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी उपस्थित जगद्गुरू गंगामाताजी, जगद्गुरू बसवरत्न माताजी व जगद्गुरू अनिमेषानंद स्वामीजींचा सत्कार उदय नेवडे, विजया आजरी व महादेव मुसळे यांच्या हस्ते झाला. गंगामाताजींनी या मार्गदर्शन प्रवचनात विश्व धर्म प्रवचनाच्या माध्यमातून शरण मेळाव्याची माहिती व प्रबोधन केले. एम. आर. नेवडे यांनी या प्रवचनाचे नियोजन केले होते.
अरविंद कित्तूरकर, रावसाहेब मुरगी, सदानंद वाली, बसवराज आजरी, तमाण्णा नेर्ली, राचाप्पा घेज्जी, विराप्पा वाली, शंकर कोरी, भैरू कोटगी, बाबूराव कापसे, सुभाष चराटी, शंकर मोर्ती, कलगोंडा पाटील, रामजी नावलगी, मलाप्पा चौगुले, उमेश आरबोळे, राजगोंडा पाटील, शंकर कोरी, अजित कोरी, सिद्धू तडसद, मारुती हुंचाळे, मारुती हळीज्वाळे, काशीनाथ कोरी, वैभव वाळकी यांच्यासह बसवदलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे सहकार्य मिळाले. महेश आरभावी यांनी सूत्रसंचालन केले. लगामान्ना कोडोली यांनी आभार मानले. प्रवचनानंतर विठ्ठल मंदिरात आयोजित महाप्रसादाचा लाभ समाजबांधवांनी घेतला.