ग्रामपंचायत निवडणूक दौरा १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निवडणूक दौरा १
ग्रामपंचायत निवडणूक दौरा १

ग्रामपंचायत निवडणूक दौरा १

sakal_logo
By

67902, 67903

लीड
जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आता प्रचाराला वेग आला आहे. सरपंच आणि सदस्यपदासाठी गावागावांत जबरदस्त चुरस असून, स्थानिक गटांची अस्तित्वाची लढाई टोकदार बनली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील तालुक्यातील हा ग्राउंड रिपोर्ट...

साहेब, आम्ही हाय की...
मतदारांना सर्वच उमेदवारांना ‘दिलासा’; ‘मूड’ सांभाळतच प्रचार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : आपआपल्या गावांना हायटेक करण्याची आणि जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नावारुपाला आणण्याची ग्वाही देत जिल्ह्यात सरपंच आणि सदस्यपदासाठी निवडणूक लढविणारे तरुण उमेदवार सकाळी-सकाळी गावातील प्रत्येक भाग पिंजून काढत आहेत. सरपंचपदासाठी निवडणूक लढविणाऱ्यांना प्रत्येकांचा ‘मूड’ सांभाळत प्रचार फेरी वेळेत पूर्ण करावी लागत आहे. आज एका प्रभागात तर उद्या दुसऱ्या प्रभागात असे नियोजन करुन गावातील कार्यकर्ते प्रचाराला बळ देत आहेत. एवढच नव्हे तर प्रचार फेऱ्यांमध्ये बॅटरीवर चालणारे मतदान (ईव्हीएम मशिन) यंत्र घेवूनच कोणते बटण दाबल्यावर आपल्याला मत मिळेले याचीही जनजागृती करत आहेत. सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत गावातील गल्ली आणि गल्ली उमदेवार आणि कार्यकर्त्यांनी फुलून गेलेली असते.

आज सकाळी झालेल्या पावसामुळे प्रचाराला काहीसा उशीरच झाला. सकाळी सातला सुरु होणाऱ्या प्रचार फेऱ्या एक तास म्हणजे सकाळी ८ नंतर सुरू झाल्या. कसबा सांगाव (ता. कागल) येथे सरपंचपदासाठी महिला आरक्षण आहे. या मोठी चुरस असणाऱ्या या गावात सकाळपासूनच आपआपल्या उमदेवाराचा प्रचार करणारी वाहने प्रत्येक गल्लीत फिरत होते. सदस्यांसाठी एकच प्रभाग आहे. मात्र, सरपरंच पदासाठी संपूर्ण प्रभाग पूर्ण करण्यासाठी उमदेवारांना सकाळी धुणी-भांडी किंवा केर-कचरा काढण्याचे काम सुरू असताना महिला मतदारांना गाठून मतदानाचे आवाहन करावे लागत आहे. मात्र, मतदारही राजकीय शहाणपण दाखवत अंदाज न देता ‘साहेब, आम्ही हाय की तुमच्यसोबत’ असा दिलासा देत आहेत.
बाचणी (ता. कागल) मध्येही मतदान मागायला येणाऱ्या उमेदवारांना रस्ते, पाणी, आरोग्याबद्दल प्रश्‍न विचारले जात आहे. गावात चांगल्या सुविधा देण्याची ताकद असणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचे ज्येष्ठ महिलांनी सांगितले. कागल तालुक्यात होत असलेल्या २६ ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये स्थानिक गटा-तटाची इर्षा, महाविकास आघाडी, शिंदे-फडणवीस गटही सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
भुदगड तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. मुदाळ, कुर, मडिलगे, मडिलगे बुद्रुक, गारगोटी या काटाजोड लढती होत आहे. आमदार, माजी आमदारांसह राजकीय नेत्यांची ही गावे असल्याने या ठिकाणी प्रचंड इर्षा पाहायला मिळत आहे.
राधानगरी तालुक्यातील ६६ पैकी बिनविरोध झालेली ग्रामपंचायती वगळता घोटवडे, कौलव, कसबा तारळे, आवळी बुद्रूक, सोन्याची शिरोली या ठिकाणी नेत्यांमध्येही नव्हे तर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सकाळी आणि सायंकाळी असा दोनवेळ प्रचार होता.ऊसाला आलेले तोडीचे नियोजन, जनावारांसाठी वैरण किंवा वाडे आणून प्रचारासाठी चकाचक असणारी कपडे परिधान करुन आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी कार्यकर्ते चप्पल झिजवत आहेत. निवडणूक असणाऱ्या गावातील प्रत्येक गल्लीत आणि गल्लीतील प्रत्येक घरावर आपआपल्या उमेदवाराचा प्रचार करणारे छोटे-मोठे फलक दिसून येत आहेत.
करवीर तालुक्यातील पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे व उचगावमध्ये जिल्ह्यातील आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या गटांमध्ये हायव्होलटेज लढती होत आहे. या ठिकाणी दिवस-दिवसभर कार्यकर्ते आपल्या उमदेवारांच्या प्रचारार्थ कार्यरत आहेत. एखादी चुकही महागात पडू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांना डोळ्यात तेल घालून प्रचार करत मतदारांना सांभाळत आहेत, तर सांगरूळ, वाकरे येथे कुंभी साखर कारखान्याचाही परिणाम दिसून येत आहे. गोकुळ शिरगाव, परिते आणि कांडगावमध्ये जरी चुरशीची निवडणूक होत असली तरीही दैनंदिन कामे सांभाळूनच प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. याव्यतिरिक्त आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ, पन्हाळा व शाहुवाडी तालुक्यातही कमी अधिक प्रमाणात याच पद्धतीने प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. माज्


चौकट
उच्चशिक्षितही रिंगणात
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अनेक गावातील सरपंच पदाचे उमेदवार हे बीएससी, एलएलबी, कॉमर्स, कला, कृषी शाखेच्या पदवीधर आहेत. त्यामुळे, अशा उमेदवारांकडून गाव बदलाच्या अपेक्षा आहेत. मात्र, शेवटी त्यांचा गावातील गट-तट किती मजबूत आहे, यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

सरपंच कोणत्या पक्षाचा होणार?
जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये महाविकास आघाडी, शिवसेना (ठाकरे गट), शिंदे-फडणवीस गट, स्थानिक विकास आघाडी व क्वचितच अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कोणत्या पक्षाचा होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ज्या गटाला किंवा पक्षाला सरपंचपदाची जागा मिळाली आहेत, त्याचे इतर घटक पक्ष किंवा आघाडीतील नेते, कार्यकर्ते प्रचारात सक्रिय असल्याचे चित्र आहे.
...