इचल:पाठीवरील ओझे अद्याप वाढलेलेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल:पाठीवरील ओझे अद्याप वाढलेलेच
इचल:पाठीवरील ओझे अद्याप वाढलेलेच

इचल:पाठीवरील ओझे अद्याप वाढलेलेच

sakal_logo
By

Ich115.txt
माथाडी कामगारांच्या पाठी पुन्हा १०० किलो ओझेच!

आंदोलन व्यर्थ ः

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. १४ ः माथाडी कामगार संघटना, ट्रान्‍स्‍पोर्ट असोसिएशन, यांच्यात २३ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत गाठ वजन मर्यादा ७० किलोवर निर्धारित केल्याने काम बंद आंदोलन मागे घेतले होते. मात्र, बैठकीतील निर्णय कागदावरच राहिल्याचे दिसते. प्रत्यक्षात पुन्हा गाठीचे वजन ९० ते १०० किलो होत असल्याने माथाडी कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. गाठ वजनाबाबत शासनाने ५० किलो वजन निर्धारित असताना याची अमंलबजावणी कधी होणार असा प्रश्न अनुउत्तरीत आहे.
इचलकरंजी या वस्त्रनगरीत दररोज हजारो टन धान्य, सूत व कापडाच्या गाठींची वाहतूक होते. ते उचलणे, चढवणे, उतरवणे, रचून ठेवणे आदी कामे माथाडी कामगारांकडून केली जातात. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक ओझे अनेक वर्षे वाहत राहिल्याने कामगारांना शारीरिक व्याधी सुरू झाल्या. व्याधी कमी करण्यासाठी हे कामगार व्यसनाचा आहारी गेल्याने अनेक कुटुंबाची वाताहत झाली. कामगारांच्या खांद्यावरील ओझे कमी करण्यासाठी सुमारे १८ वर्षांपासून काही कामगार संघटना संघर्ष करत आहेत. मात्र त्यांना यश आलेले नाही.
शहरात माथाडी कामगारच्या पाठीवरील ओझे कमी होण्यासाठी शहरातील माथाडी कामगार आणि टेम्पो कामगारांनी सप्टेंबरमधे कामबंद आंदोलन केले. २३ सप्टेंबरला कृती समिती व ट्रान्‍स्‍पोर्ट असोसिएशन वजन नियंत्रण समितीमध्ये झालेल्या तडजोड करारपत्रामध्ये १ ऑक्टोबरपासून गाठीचे वजन ७० किलो इतके मर्यादित ठेवणे, ट्रान्‍स्‍पोर्ट ऑफिसने अधिक वजनाच्या गाठीचे बुकिंग करू नये असे नमूद केले. मात्र हा करार कागदावरच राहिला.

माथाडी कामगार
- शहरात नोंदणीकृत संख्या ः ४५०
- अनोंदणीकृत कामगार ः १५००
- टेम्पोचालक व इतर हमाल ः ४००

-----------
चौकट
वजन नियंत्रण ठेवणारी समिती ही कागदावरच
बैठकीत गाठीचे वजन निर्धारित केल्यानंतर बैठकीमध्ये सात सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय झाला होता. या वेळी, अधिक वजनाची गाठ आढळल्यास दंड आकारून तो कामगार कल्याण मंडळात भरण्याचा निर्णय तडजोड पत्रामध्ये नमूद केला आला होता. मात्र ही समितीची ही केवळ तडजोड पत्रावरच राहिल्याने गाठींचे वजन कमी कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-------
चौकट
निर्देशानाला केराची टोपली
आंतर राष्ट्रीय श्रम संघटनेने (आय एल ओ) २८ ऑक्टोबर १९९९ रोजी परिपत्रक प्रसिद्ध करून गाठींचे वजन ५० किलो असणे बंधनकारक केले. मात्र २३ वर्षांचा कालावधी लोटला असतानाही नियमांचे पालन होताना दिसत नाही. शासन नियम पायदळी तुडविताना दिसत आहेत.
------
दृष्टिक्षेप
गाठींचे ओझे कमी करण्यासंदर्भात झालेल्या बैठका व निर्णय
तारीख - निर्णय
- ६ जानेवारी २००३ - ९० किलो
- ७ मे २०१२ - ७५ ते ८० किलो
- २२ फेब्रुवारी २०२०- ७० ते ७५ किलो
-२३ सप्टेंबर २०२२ -७० किलो