
रस्ते गल्लीतील करणाऱ्यावर भर
67897
गल्लीतील रस्ते डांबरीकरणावर भर
कोल्हापूर, ता. ११ः आंदोलने, अधिकारी-ठेकेदारांवरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यांची कामे सुरू केली असली तरी त्यात गल्ली-बोळातील रस्त्यांवर भर दिसत आहे. वर्दळीच्या रस्त्यांची कामे केव्हा पूर्ण होणार याची नागरिकांना प्रतीक्षा लागलेली आहे. काही ठिकाणी पॅचवर्क केले जात आहे.
अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर कामे सुरू केली जातील असे सांगितले होते. अजूनही कामे सुरू झाली नसल्याने गेल्या आठवड्यात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ठेकेदारांवर कारवाई केली व त्यापाठोपाठ शहर अभियंत्यांना नोटीस देण्याबरोबरच उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना दंड बजावला. ठेकेदारांवर कारवाई केल्यानंतर तेव्हापासून काही भागात कामे सुरू झाली. त्यात पंचगंगा नदीजवळील गायकवाड पुतळा ते तोरस्कर चौक हा मोठा रस्ता होता. त्याशिवाय ज्या कामांची छायाचित्रे महापालिकेनेच प्रसिद्धीसाठी दिली आहेत, त्यात सुभाषनगर, दत्त भगीरथी नगर, पुईखडी कचरा वर्गीकरण शेड, काशीद बोळ, गंजी गल्ली येथील कामांचा समावेश आहे.
या रस्त्यांची कामे मंजूर असल्याने ती केली जात असतील. पण, वर्दळीच्या रस्त्यांवर पर्यटक वा शहरातील नागरिकांची मोठी वर्दळ असते, तसेच जे रस्ते अर्धवट केले आहेत त्यांची कामे केव्हा सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.