गडहिंग्लजला पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला पाऊस
गडहिंग्लजला पाऊस

गडहिंग्लजला पाऊस

sakal_logo
By

L67928
गडहिंग्लज : रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------
गडहिंग्लजला पावसाने
विक्रेत्यांची तारांबळ
गडहिंग्लज: शहरासह तालुक्यात ठिकठिक़ाणी आज सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी मध्यम स्वरूपाच्या पावसाने आज गडहिंग्लजच्या आठवडा बाजारातील विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
हवामान अंदाजानुसार आज सकाळपासूनच गडहिंग्लज परिसरात ढगाळ वातावरण होते. दिवसभरात अधून-मधून पावसाच्या तुरळक थेंबही पडले, परंतु सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि पावसाला प्रारंभ झाला. हा पाऊस रब्बी पिकांसाठी चांगला असला तरी ऊस तोडणीमध्ये अडसर ठरला आहे. साडेसहाच्या सुमारास दहा मिनिटे जोरदार पाऊस झाला. यामुळे आठवडा बाजारातील विक्रेत्यांची धावपळ उडाली होती. हरभरा, ज्वारी आदी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. सध्या सर्वत्र ऊस तोडणी सुरू आहे. या पावसाने ओल तयार होणार असल्याने तोडणीत व्यत्यय येणार आहे. कारखान्याच्या गाळपावरही त्याचा परिणाम जाणवणार आहे.
....
आजऱ्यात गवत कापणीला फटका
आजरा ः आजरा शहर व परिसरात आज सायंकाळच्या सुमाराला अवकाळी पाऊस झाला. यामुळे गवत कापणीला फटका बसला आहे. गवत कापणीचे काम बंद पडले असून, वाळत टाकलेल्या गवतावर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर कारखान्यांची ऊस तोडणी ठप्प झाली आहे. सध्या तालुक्यात ग्रामपंचायतीच्या प्रचाराचा धुरळा उठला आहे. निवडणुका लागलेल्या गावात प्रचार फेरी, भेटीगाठी सुरू आहेत, पण आज झालेल्या अवकाळी पावसाने नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
....
कोवाड परिसरात पावसाची हजेरी

कोवाड ः कोवाड परिसरात रविवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवेत गारवा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजता थोडा पाऊस पडून गेला पुन्हा सात वाजता जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे गवताच्या गंज्या भिजल्या. ऊस तोडणीवर परिणाम झाला आहे. ऊस भरलेली वाहने उसाच्या फडातून काढताना शेतकऱ्यांची कसरत झाली.