Mon, Feb 6, 2023

शिष्यवृत्ती बंद न करण्याची मागणी
शिष्यवृत्ती बंद न करण्याची मागणी
Published on : 12 December 2022, 4:24 am
शिष्यवृत्ती बंद
न करण्याची मागणी
आजरा, ता. १२ ः केंद्र शासनातर्फे देण्यात येणारी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना बंद केली आहे. ती पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आजरा तालुका अल्पसंख्याक विभागाकडून केली. याबाबतचे निवेदन येथील तहसीलदारांना दिले. निवेदनाची प्रत राष्ट्रपतींना पाठवली आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अरिफ तांबोळी, आजरा तालुकाध्यक्ष नबीसाब खलीफ, इम्रान सोनेखान, फिरोज दीडबाग, रजाक मुराद, उमेश माणगावकर, तौसिफ भडगावकर, अब्दुल माणगावकर, वशिम ढालाईत आदींची स्वाक्षरी आहे.