निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

67937
मनोहर कदम
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथील गव्हर्न्मेंट काँन्ट्र्क्टर मनोहर शंकरराव कदम (वय ७७) यांचे निधन झाले. ते श्री. दत्तप्रसाद कन्स्ट्रक्शनचे संस्थापक होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पंचगंगा विहार मंडळाचे प्रशांत कदम यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन उद्या (ता. १२) सकाळी नऊ वाजता आहे.

67941
राजेंद्र ढेंगे
कोल्हापूर : शिवाजी पेठ, महाकाली गल्ली येथील राजेंद्र रामचंद्र ढेंगे यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन उद्या (ता. १२) आहे.

67952
बळीराम पाटील
कसबा वाळवे : येथील बळीराम दत्तात्रय पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. ग्रामपंचायतीचे ते माजी सदस्य, तर कासारवाडा हायस्कूलचे निवृत्त क्रीडाशिक्षक होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १२) कसबा वाळवे येथे आहे.

01850
कृष्णात गायकवाड
कसबा तारळे : तारळे खुर्द (ता. राधानगरी) येथील कृष्णात गोविंद गायकवाड (वय ७०) यांचे निधन झाले. भोगावती सहकारी साखर कारखान्याचे ते निवृत्त कर्मचारी होते. राधानगरी एसटी आगाराचे चालक सर्जेराव गायकवाड यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. १२) आहे.

01987
किरण धनवडे
राशिवडे बुद्रुक : पुंगाव (ता. राधानगरी) येथील किरण गोविंद धनवडे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मुलगा आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. १२) आहे.

01799
पार्वती तोंदले
बांबवडे : थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील पार्वती शंकर तोंदले-चव्हाण पाटील (वय ८९) यांचे निधन झाले. त्या माजी मुख्याध्यापक शिवाजी तोंदले व माजी सरपंच बाजीराव तोंदले यांच्या आई होत. रक्षाविसर्जन उद्या (ता. १२) आहे.

01824
शोभा मिरजकर
मलकापूर : येथील माजी नगराध्यक्षा व राजाई महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा शोभा सदानंद मिरजकर (वय ५८) यांचे निधन झाले. त्याच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे.

00343
दगडू पाटील
देवाळे : कोतोली (ता. पन्हाळा) येथील दगडू शंकर पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन उद्या (ता. १२) आहे.

01006
धनाजीराव जाधव
कडगाव : ममदापूर (ता. भुदरगड) येथील धनाजीराव काकासाहेब जाधव (वय ६६) यांचे निधन झाले. ते राष्ट्रीय कबड्डीपटू, वेटलिफ्टर खेळाडू होते. व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून निवृत्त झाले. ते पद्‌मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबईचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.