अपघातात महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात महिलेचा मृत्यू
अपघातात महिलेचा मृत्यू

अपघातात महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

03157
शीतल कवडे

६७९५०

ट्रकच्या धडकेत महिला ठार
---
राजाराम महाविद्यालयाजवळ अपघात; दोघी जखमी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत शीतल सतीश कवडे (वय ३०, रा. दादू चौगलेनगर, उजळाईवाडी, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली त्यांची मुलगी इशिता (४) आणि वैजयंती अशोक पाटील (४८, रा. दादू चौगुलेनगर, उजळाईवाडी) या बचावल्या. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास राजाराम महाविद्यालय चौकात टपाल कार्यालयासमोर हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शीतल आणि वैजयंती या इशिताला सोबत घेऊन ओढ्यावरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरून शहरात आल्या. दर्शन घेतल्यावर त्या टेंबे रोड येथील वैजयंती यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या. त्यानंतर तेथून त्या बहिणीसह पुन्हा उजळाईवाडीकडे जाण्यासाठी निघाल्या. या वेळी राजाराम महाविद्यालयाजवळ असणाऱ्या चौकात टपाल कार्यालयासमोर मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. हा ट्रक खत घेऊन कागलच्या दिशेने निघाला होता. धडकेनंतर इशिता आणि वैजयंती या दूर फेकल्या गेल्या, तर शीतल ट्रकच्या चाकाखाली आल्या. त्यांच्या कमरेखालच्या भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून ‘सीपीआर’मध्ये आणण्यात आले. तेथील रिक्षाचालक जितेंद्र संभाजी शिंदे यांनी इशिता आणि वैजयंती यांना रिक्षातून ‘सीपीआर’मध्ये आणले. त्या दोघींना किरकोळ दुखापत झाली होती. मात्र, शीतल यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.

नातेवाइकांचा आक्रोश
या अपघाताची माहिती नातेवाइकांना कळताच त्यांनी ‘सीपीआर’कडे धाव घेतली. शीतल यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी हंबरडा फोडला. चार वर्षांच्या इशिताला काय होत आहे, हे समजत नव्हते. तिच्याकडे पाहून नातेवाईक आक्रोश करीत होते.
-------------------------

आवळी बुद्रुक गावावर शोककळा
येथील शीतल सचिन कवडे (वय ३२) यांचा कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ चौकात झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच आज दुपारनंतर त्यांच्या मूळ आवळी बुद्रुक गावात शोककळा पसरली. शीतल यांचे पती सचिन कवडे हे कोल्हापूर येथे संजीवन ब्लड बॅंकेत काम करतात. ‘सीपीआर’मध्ये विच्छेदनानंतर आवळी बुद्रुक येथे सायंकाळी सौ. शीतल यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, चार वर्षांची मुलगी, सासू व सासरे असा परिवार आहे. मनमिळाऊ, सुस्वभावी शीतल यांच्या अशा अपघाती मृत्युमुळे गावातील नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.