
ई-स्टोअरमधील संशयीतांना पोलिस कोठडी
ई-स्टोअर प्रकरणातील
संशयितांना पोलिस कोठडी
‘वैदिका आयुर’ च्या अध्यक्ष, संचालकांचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः ई-स्टोअर सुरू करून देण्याच्या बहाण्याने ३८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघा संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना मंगळवार (ता.१३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, वैदिका आयुर केअर हेल्थ अँड रिटेल प्रा. लि. कंपनीचे अध्यक्ष आणि संचालकांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणामध्ये विनायक कृष्णा राऊत (रा. कासारवाडा, ता. राधानगरी), प्रकाश शंकर चौगले (रा. ४ थी गल्ली, शाहूपुरी) आणि अरविंद सत्यनारायण मिश्रा (रा. सातवी गल्ली, राजारामपुरी) यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी दिली. तसेच कंपनीचे संचालक आणि अध्यक्ष यांचा शोध सुरू आहे. या कंपनीची बँक खाती, आर्थिक व्यवहारांचीदेखील पोलिस चौकशी करणार असून, त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.