
ऑनलाईन मिटींग घेऊन गुंतवणूरदारांची काढली समजूत
१५ जानेवारीपर्यंत थांबलेले परतावे देणार
ए.एस.ट्रेडर्स कंपनीच्या संचालकांचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः ए. एस. ट्रेडर्स कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांबरोबर एक ऑनलाईन मीटिंग घेतली. यामध्ये त्यांनी आपण १५ जानेवारीपर्यंत थांबलेले परतावे सुरू करू, असे आश्वासन दिले. तसेच कंपनीचे कामकाज सुरू करण्याच्या सूचना ग्रुप लिडर्स आणि कर्मचाऱ्यांना दिल्या. मात्र कृती समितीने हे आश्वासन फसवे असल्याचे सांगितले. कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याने ही मीटिंग घेतली.
यामध्ये त्याने कंपनीने पैसे कोठे गुंतवले आहेत याची माहिती दिली. भविष्यात केवळ ट्रेडिंगमध्येच गुंतवणूक केली जाईल, असे आश्वासन त्याने दिले. तसेच १५ जानेवारीपर्यंत थांबलेले परतावे देणार असल्याचे सांगितले. कंपनीचे कामकाज सुरू करण्याबद्दल त्याने बैठकीतून ग्रुप लीडर्स आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच लवकरच कार्यालये सुरू करणार असल्याचेही सांगितले.