सकाळ सुपर फॅमिली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ सुपर फॅमिली
सकाळ सुपर फॅमिली

सकाळ सुपर फॅमिली

sakal_logo
By

(सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेचा लोगो मा. दिलीप यादव यांच्याकडून घेणे)
-
67954

पेठवडगावच्या रूपाली झगडे लॅपटॉपच्या मानकरी
निकाल जाहीर ः सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेची सोडत उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः सकाळ माध्यम समूहातर्फे झालेल्या सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेची सोडत आज अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते झाली. त्यामध्ये लॅपटॉपसाठीच्या बंपर सोडतीत पेठवडगावच्या रूपाली झगडे भाग्यवान विजेत्या ठरल्या. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक असणाऱ्या गिअर सायकलच्या पहिल्या बक्षिसासाठी ही सोडत झाली. त्यामध्ये पीयूष सावंत (कसबा बावडा), सुजाता गवस (पाटणे, ता. चंदगड), साक्षी सचिन औंधकर (विश्रामबाग, सांगली), सार्थक संदीप घाडगे (भरणे ग्रामपंचायत, ता. खेड), मीनाक्षी अजित सुरुंगले (जामसंडे, ता. देवगड), प्रज्योत गजानन इंगळे (ममदापूर, ता. निपाणी) भाग्यवान विजेते ठरले.
‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, मुख्य बातमीदार निवास चौगले, सह उपसरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा) अरविंद वर्धमाने, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी भरघोस बक्षिसांची एक जुलै ते ११ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये शंभर दिवसांची ही स्पर्धा झाली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार करून प्रसिद्ध केलेल्या मजकुरावर आधारित ही स्पर्धा होती. स्पर्धेत २७ हजार नऊशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक सहभागी स्पर्धकासाठी हमखास बक्षीस म्हणून स्कूल बॅगचे वितरण यापूर्वीच झाले आहे.
.............
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा...
० बंपर बक्षीस - (लॅपटॉप) ः रूपाली विशाल झगडे (शिवाजीनगर, पेठवडगाव)

० पहिले बक्षीस (गिअर सायकल)
पीयूष अमोल सावंत (भगतसिंग वसाहत, कसबा बावडा), सुजाता सुनील गवस (पाटणे, ता. चंदगड ), साक्षी सचिन औंधकर (विश्रामबाग, सांगली), सार्थक संदीप घाडगे (भरणे ग्रामपंचायत, गणेशनगर, ता. खेड, जि. रत्नागिरी), मीनाक्षी अजित सुरूंगले (सहकारनगर, जामसंडे ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग),
प्रज्योत गजानन इंगळे (ममदापूर, ता. निपाणी, जि. बेळगाव).

० दुसरे बक्षीस (फिटनेस बँड)
सुनील सदाशिव आरवाडे (जगदाळे कॉलनी, प्रतिभानगर), शोभा मनोहर घोरपडे (मरगाई गल्ली, शिवाजी पेठ), राजलक्ष्मी संजय मोहिते (सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर), अरुणा युवराज जाधव (योगेश्वर कॉलनी, पाचगाव रोड), समर्थ अनिल जाधव (सिद्धनेर्ली, ता. कागल), पूनम विश्वास पाटील (बेलवळे बुद्रुक, ता. कागल), विराज संदीप मेथे (बोरिवडे, ता. पन्हाळा), आदिती राजेंद्र ढेरे (शाहू कॉलनी, कालभैरी रोड, गडहिंग्लज), कार्तिक निंगाप्पा गणाचारी (किणी, ता. चंदगड), सचिन अशोक गायकवाड (दत्तवाड, ता. शिरोळ), अनुजा रवींद्र माळी (नवे पारगाव, ता. हातकणंगले), शोभा दशरथ पाटील (गिरगाव ता. करवीर), रोहित प्रभाकर लोहारे (विजयनगर, शामनगर, कुपवाड- सांगली), रामा गोविंद बापट (मारुती चौक, गावभाग, सांगली), अमोल विलास भेडसे (शिवाजी चौक, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), आर्यन युवराज माने (खेराडेवांगी, ता. कडेगाव, जि. सांगली), अक्षय राजेंद्र जमदाडे (विटा, ता. खानापूर), प्रियांका अनिल शिरोळे (टाकळी रोड, मिरज), रसिका तुकाराम चळके (सलगरे, ता. मिरज, जि. सांगली), मनीष विठ्ठल पेडणेकर (वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला), राधिका रामचंद्र माने (धनगरवाडी पोईप, ता. मालवण), मनीषा भरत पोतदार (चिपळूण, ता. चिपळूण), निधी शेखर जोशी (रत्नागिरी, ता. रत्नागिरी), दर्शन रामदास पवार (मारुती गल्ली, बेळगाव).

० तिसरे बक्षीस (डिनर सेट)
स्वरूपा उमेश सुर्वे (शनिवार पेठ, कोल्हापूर), संयोगिता विजयसिंह देसाई (टाकाळा, कोल्हापूर), विहान निखिल रोकडे (कदमवाडी, कोल्हापूर), निशांत किशन वाधवानी (ताराबाई पार्क, कोल्हापूर), संतोष आनंदराव मेडशिंगे (बाबा जरगनगर, कोल्हापूर), संदीप शिवाजी भोगम (फुलेवाडी, रिंग रोड, कोल्हापूर), सुवर्णा विजयकुमार पोवार (कसबा बावडा, कोल्हापूर), जयवंत गणपराव पाटील (कळंबा, कोल्हापूर), ओमकार सचिन खुटाळे (वाळवे खुर्द, ता. कागल), संकेत अनिल गुरव (कोनवडे, ता. भुदरगड), सृष्टी शशिकांत माने (मडिलगे बुद्रुक, ता. कागल), शाहीन शब्बीर देसाई (सेनापती कापशी, ता. कागल), आर्यन पांडुरंग लोकरे (मुरगूड, ता. कागल), सचिन कृष्णात रणदिवे (राशिवडे, ता. राधानगरी), कलावती सचिन संसारे (मलकापूर, ता. शाहूवाडी), स्वराज अमित पाटील (यवलूज, ता. पन्हाळा), वर्षा विनायक दाभाडे (कोतोली, ता. पन्हाळा), सोनाली आनंदा पवार (कौलगे, ता. गडहिंग्लज), गीता दशरथ संकपाळ (वडकशिवाले, ता. आजरा), अश्विनी आप्पासो जाधव (निलजी, ता. गडहिंग्लज), प्रणाली रावसाहेब बिरंजे (भडगाव, ता. गडहिंग्लज), शीतल मंगेश देसाई (नेसरी, ता. गडहिंग्लज), उज्ज्वला सुनील जाधव (झेंडा चौक, इचलकरंजी), अर्पिता सुधीर गजरे (दाते मळा, इचलकरंजी), मंगल दिलीपराव माने (दत्त हौसिंग सोसायटी, जयसिंगपूर), कस्तुरी अमोल पाटील (कुरुंदवाड, ता. शिरोळ), सिद्धी बन्सी सूर्यवंशी (हुपरी, ता. हातकणंगले), सोनाक्षी सचिन दानवाडे (किणी, ता. हातकणंगले), पायल शशिकांत राऊत (रुकडी, ता. हातकणंगले), रिया राजेंद्र पाटील (कुरुकली, ता. करवीर), छाया कृष्णात आमटे (कोथळी, ता. करवीर), पूजा अमर नाळे (सांगरुळ, ता. करवीर), अथर्व शीतल भागवत (मार्केट यार्ड, सांगली), रुद्र मनोहर भुर्के (हरिपूर रोड, सांगली), मैथिली धोंडिराम जाधव (लालबाग गणेश मंदिर, सांगली), प्रसाद शिवाजी पाटील (किसान चौक, सांगलीवाडी), मधुरा मनोज संचेती (मंगळवार पेठ, माधवनगर), राज राहुल यमगर (कासेगाव, ता. वाळवा), रूपाली हणमंत जाधव (गोळेवाडी, ता. वाळवा), पायल दिलीप कवठेकर (आष्टा, ता. वाळवा), इंद्रनील सागर शिंदे (शिराळा, ता. शिराळा), मंगल मारुती चौगले (कोकरूड, ता. शिराळा), श्रीकांत मारुती भोई (सुभाषनगर, मिरज), नंदा यशवंत कांबळे (यशवंत कॉलनी, कोकणे गल्ली, मिरज), रूपाली सिदगोंडा पाटील (तासगाव, ता. तासगाव), मृदुला प्रदीप पाटील (अंकलखोप, ता. पलूस), सारिका सुरेश चव्हाण (शिरढोण, ता. कवठेमहांकाळ), सुशांत गजानन तांदळे (जत, ता. जत, जि. सांगली), सागर चंद्रकांत मेस्त्री (मळगाव, ता. सावंतवाडी), गौरवी भारत गवळी (सबनीसवाडा, सावंतवाडी), भावेश अरविंद आंगवलकर (श्रीधर पार्क, कालमठ, कणकवली), वेदिका विनायक जाधव (उदयनगर, दापोली, ता. दापोली), खुशी नीलेश शेठ (खेड, ता. खेड), रोहन रवींद्र शिंदे (देवरूख, ता. संगमेश्वर), नीती रामचंद्र मोरे (राजापूर, ता. राजापूर), पुष्कर संजय देसाई (लांजा, ता. लांजा), राघव बाळासाहेब चापगावकर (हिंदूनगर खानापूर ता. खानापूर), नैतिक यशवंत कोवाडकर (उचगाव, ता. बेळगाव), सुजित तात्यासाहेब यादव (कुर्ली, ता. निपाणी), स्वाती प्रवीण माने (कोढणी, ता. निपाणी).
................
कोट
68118
आमच्याकडे बरीच वर्षे ‘सकाळ’ आहे. बातम्यापलीकडेही विविध विधायक उपक्रमात ‘सकाळ’ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. नुकत्याच झालेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेमुळे कुटुंबातील सर्व मंडळींसाठी माहिती व ज्ञानाचा खजिना उपलब्ध झाला. बंपर बक्षीस जाहीर झाल्याचे समजताच अत्यानंद झाला.
- रूपाली झगडे, पेठवडगाव