प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंचाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंचाचे प्रकाशन
प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंचाचे प्रकाशन

प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंचाचे प्रकाशन

sakal_logo
By

gad121.jpg
67955
गडहिंग्लज : शिक्षणमंचतर्फे झालेल्या कार्यक्रमात परीक्षा संचाचे प्रकाशन करताना चैतन्य कुराडे, भाऊसाहेब आंबुलकर. शेजारी सुभाष निकम, मधुकर येसणे, बाळासाहेब वालीकर आदी.

प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंचाचे प्रकाशन
गडहिंग्लज : येथील प्राथमिक शिक्षक पतसंस्था, पी. सी. पाटील गौरवनिधी व मधुकर येसणे गौरवनिधी संचालित शिक्षण मंचतर्फे प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंचाचे प्रकाशन झाले. राज्य कर अधिकारीपदी निवड झालेले चैतन्य कुराडे व भाऊसाहेब आंबुलकर यांच्याहस्ते प्रकाशन झाले. शंकर साळोखे अध्यक्षस्थानी होते. शिक्षण मंचतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमुळे शालेय वयातच स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम झाल्याचे मत श्री. कुराडे व श्री. आंबुलकर यांनी व्यक्त केले. शिक्षक नेते मधुकर येसणे, श्री. साळोखे, अर्चना निळकंठ, पांडुरंग करंबळकर यांचीही भाषणे झाली. प्रश्नसंच निर्मिती केलेल्या शिक्षकांचा सत्कार झाला. कार्याध्यक्ष शरद देसाई यांनी स्वागत केले. अध्यक्ष सचिन पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत पाटील व मालन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिव विक्रम गडकर यांनी आभार मानले.
-----------------------------
gad122.jpg
67956
अत्याळ : दलित वस्तीतील रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करताना सतीश पाटील. शेजारी जयसिंग पाटील, आनंदराव माने, पृथ्वीराज पाटील, प्रा. एस. आर. पाटील, विजय मोहिते आदी.

अत्याळमध्ये रस्ता कामाचा प्रारंभ
गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे दलित वस्तीतील रस्त्याच्या कामाचा प्रारंभ केला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते सुरवात झाली. श्री. पाटील यांच्या प्रयत्नातून दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत रस्त्यासाठी ११ लाख ५० हजारांचा निधी मिळाला आहे. रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी प्रा. एस. आर. पाटील, जयसिंग पाटील, पृथ्वीराज पाटील, अदित्य पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित होते.
-------------------------------
शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित प्राविण्य परीक्षेत यश मिळवले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे परीक्षा घेतली होती. पाचवीचे यश चव्हाण, कार्तिक बोरसे, अथर्व होडगे, शर्वरी केसरकर, शार्दुल निंबाळकर, पूर्वी करजगे, अदित्य साळोखे तर आठवीचे अनघा लाटकर, तनिष्का बेलवाडकर, पूर्वा गुरव, समर्थ रोटे, चेतन कडूकर पात्र ठरले. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांचे प्रोत्साहन तर शोभा चव्हाण, श्रीधर खोराटे, माधुरी पोवार, राजाराम माने यांचे मार्गदर्शन मिळाले.