यमेहट्टी शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यमेहट्टी शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
यमेहट्टी शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

यमेहट्टी शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

gad123.jpg
68017
गडहिंग्लज : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील यमेहट्टी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना नवलकुमार हलबागोळ. शेजारी एकनाथ पाटील, मोहन पाटील, महादेव पाटील.
----------------------------
यमेहट्टी शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
ग़डहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. स्पर्धेत यमेहट्टी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सांघिक स्पर्धेत कबड्डीत मुलींच्या संघाने, तर रिलेत मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. वैयक्तिक स्पर्धेत वरिष्ठ गटात पूजा गावडे हिने ६०० मीटर व ४०० मीटरमध्ये पहिला क्रमांक पटकावला. विद्या गावडे हिने २०० मीटरमध्ये दुसरा, लक्ष्मण मेंगूलकर याने १०० मीटरमध्ये दुसरा, तर मानसी गावडेने ६०० मीटरमध्ये तिसरा क्रमांक मिळवला. कनिष्ठ गटात कार्तिक गावडे याने ५० मीटर धावणेत दुसरा, तर कुस्तीत मानसी गावडेने ३० किलो वजनी गटात पहिला क्रमांक पटकावला. प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण झाले.