गोकुळ बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ बातमी
गोकुळ बातमी

गोकुळ बातमी

sakal_logo
By

68064

कवठेमहांकाळ तालुक्यात
‘गोकुळ’चे बल्क मिल्क कुलर

कोल्हापूर, ता. १२ ः कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) क्‍लस्‍टर बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्‌घाटन कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील माऊली दूध शीतकरण केंद्रात झाले. संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्‍या हस्ते, तसेच युवा नेते रोहित आर. पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
रोहित पाटील म्‍हणाले, ‘कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये दूध उत्पादकांना संजीवनी देण्याचे काम ‘गोकुळ’ निश्चितच करेल.’
अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘या तालुक्‍यात वेगवेगळ्या भागात भविष्यात क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरस युनिट सुरू करून उत्तम गुणवत्तेचे दूध संकलन करण्याचा मानस आहे.’ संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केले. विकास हाक्‍के, विकास कदम, चंद्रकांत हाक्‍के, गणपत चव्‍हाण, शामराव घाटगे, गणेश कदम, सोपानराव जगदाळे, सुभाष खांडेकर उपस्थित होते.
स्वागत व प्रस्ताविक माऊली दूध संस्थेचे संस्थापक पोपटराव कदम यांनी केले. आभार सुभाष खांडेकर यांनी मानले. सूत्रसंचालन शहाजी कदम यांनी केले.